तुकड्या ची झोपडी स्मरणिका प्रकाशित होईल चंद्रपूर – वणी लोक सभा क्षेत्रात – मधुसूदन कोवे गुरुजी

सहसंपादक : रामभाऊ भोयर

ग्राम स्वराज्य महामंच च्या वतीने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या विचार प्रेरणेतून गावातील सामान्य व्यक्ती एका पुस्तकात प्रकाशित व्हावा.आणि त्याचं व्यक्तिमत्त्व सर्व घटकांना माहित व्हावे.या साठी सामाजिक उपक्रम म्हणून “‘ तुकड्याची झोपडी “‘ स्मरणिका ग्राम स्वराज्य महामंच गेल्या चार वर्षांपासून प्रकाशित करतं आहे. ही स्मरणिका प्रकाशित करण्याचा एकमेव उद्देश म्हणजे सामान्य व्यक्ती ला संधी उपलब्ध करून देणे त्यांच्या भावना प्रकाशित करणे आणि त्यांच्या मनात जो सामाजिक आणि मानवतावादी विचार आहे त्या व्यक्तीच्या पाठीवर कौतुकाची थाप म्हणून “‘ माणिक रत्न पुरस्कार “‘ देवुन सन्मान करणे या साठी हा उपक्रम आहे.”‘ तुकड्याची झोपडी “‘ पहिलं प्रकाशन नागपूर दुसरे प्रकाशन वर्वा तिसरे प्रकाशन यवतमाळ आणि चौधे प्रकाशन चंद्रपूर – वणी लोक सभा क्षेत्रात होतं आहे.यासाठी ग्राम स्वराज्य महामंच चे अध्यक्ष मा मधुसूदन कोवे गुरुजी आणि सर्व कार्यकारी संचालक मा.प्रा.मोहणजी वडतकर, श्रीमती आशाताई काळे,मा गिरीधर जी ससनकर डॉ रेखाताई निमजे यांच्या मेहनतीने आणि सहकार्याने जानेवारी च्या तिसऱ्या आठवड्यात तुकड्याची झोपडी स्मरणिका प्रकाशन सोहळा आणि माणिक रत्न पुरस्कार प्रदान सोहळा होतं आहे तरी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या विचारांचा मानणाऱ्या व्यक्ती नी सहभागी व्हावे असे आवाहन मा मधुसूदन कोवे गुरुजी, अध्यक्ष ग्राम स्वराज्य महामंच यांनी केले आहे