
सहसंपादक : रामभाऊ भोयर
अंत्यसंस्कारानंतर मृत व्यक्तीची रक्षा/राख वाहत्या पाण्यात विसर्जित करण्याची प्रथा आहे, पंचतत्त्वाने बनलेले मानवी शरीर जलतत्त्वात प्रवाहित व्हायला पाहिजे परंतु आज अनेक ठिकाणी प्रवाही जल उपलब्ध नसते तसेच ही कृती जल प्रदूषणास कारणीभूत ठरते. ही रक्षा / राख विसर्जन शेतामध्ये किंवा झाडांच्या अवतीभोवती टाकण्यामागे नवा शास्त्रीय दृष्टिकोन समोर आला आहे. यामध्ये अग्निसंस्कारानंतर रक्षा ,जलतत्त्वा ऐवजी पृथ्वीतत्त्वात, जमिनीत विसर्जित केल्यास,झाडांना ते उत्तम खत म्हणून कामी येत. राखेत पोटॅशियम, कॅल्शियम, फॉस्फरस,मॅग्नेशियम हे सूक्ष्म पोषक घटक असतात, ते मातीची सुपीकता वाढवितात. हिच जाणीव ठेवून डॉ कावलकर व परिवार यांनी आपल्या आईच्या रक्षा विसर्जनाच्या या नवीन विचारास चालना दिली व आईच्या स्मृती प्रीत्यर्थ एक झाड ही लावण्यात आले.
श्रीमती लिलाबाई श्रीरामपंत कावलकर यांचे निधनानंतर तिसऱ्या दिवशी त्यांच्या रक्षा प्रयास वनातील झाडांभोवती विसर्जित केल्या . ही राख झाडांच्या वाढीस उपयुक्त असून त्यामुळे सूक्ष्म जैविक क्रियाशीलता वाढते. जलप्रदूषण टाळून, जमिनीत रक्षा विसर्जन म्हणजे आत्म्याच्या मुक्तीचा, पंचमहाभुताशी पुनर्मिलनाचा भाव,असा पर्यावरण पूरक संदेश यामधून दिला गेलाय. ही कृती म्हणजे जीवन चक्राचा पूर्णत्व बिंदू होय,यवतमाळ करांनी याचे अनुकरण निश्चित करावे,असे विचार, अमरावतीचे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ अविनाश सावजी यांनी याप्रसंगी बोलताना व्यक्त केले. या प्रसंगी अनेक समाज बांधव व प्रयासी सदस्य उपस्थित होते.
