सहसंपादक : रामभाऊ भोयर
महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुका जशा जशा जवळ येत आहे तसं तसे अनेक उमेदवार पक्षाच्या उमेदवारीची वाट न पाहता मतदार संघात मतदारांच्या भेटी घ्यायला लागले असून मतदारसंघातील ग्रामपातळीवरील, तालुका पातळीवरील वेगवेगळ्या पक्षाचे कार्यकर्त्यांच्या घरी जाऊन भेटी देऊन मलाच पक्षाची उमेदवारी मिळणार अशी ग्वाही देत असून मला आपल्या मतदारसंघातील विकासकामे करायची आहे जी आजपर्यंतच्या लोकप्रतिनिधींनी दुर्लक्षित केली आहे.अनेक गावातील अंतर्गत विकास कामे,पांदन रस्ते, तालुक्यावरून गावाला जोडलेले रस्त्याचे काम, मतदार संघात नळयोजनाची पडलेली कामे, अनेक गावांमध्ये नाला रुंदीकरण व खोलीकरणची कामे , जंगली जनावरांपासून शेतकऱ्यांना होणाऱ्या त्रासामुळे शेतकऱ्यांच्या शेतांना संरक्षण म्हणून तार कुंपण करण्याची मागणी, मतदार संघातील प्रत्येक शेतकऱ्यांना कर्जमाफी जाहीर करून शेतकऱ्यांना भरीव मदतीची मागणी करणार असून या वर्षी मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्याने शेतकरी पाहिजे त्या पद्धतीने उत्पादन घेण्यात अपयशी ठरत असल्याने ताबडतोब मदतीची मागणी करणार आहे असे एक ना अनेक प्रश्न घेऊन मतदारसंघ पिंजून काढत आहे. या वेळी सुद्धा विधानसभा निवडणुकीत अनेक उच्चशिक्षित आणि नवखे उमेदवार म्हणून मैदानात उतरले असून हे उमेदवार वरील विषयावर मतदारांशी चर्चा करत असेल तर आजपर्यंत विधानसभा प्रतिनिधी म्हणून काम करणाऱ्या लोकप्रतिनिधींनी कुठली कामं केली असा प्रश्न उपस्थित होत असून जर अनेक विकासाच्या योजना आणल्याचा कांगावा करणारे आजी माजी आमदार असतील तर ह्या शासनाच्या वतीने असलेल्या योजना असून या तुटपुंज्या योजनेने आमचा शेतकरी शेतमजूर परिवार स्वताचा आणि परिवारांचा सर्वांगिण विकास करू शकतो का असा पण कांगावा जनतेसमोर करत असल्याने उमेदवार सांगत असलेले मुद्दे खरोखरच आहे असा सुर मतदारातून निघतांना दिसत आहे.