
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225)
पुसद मध्ये पुन्हा एकदा तरुणाच्या निर्घृण हत्येने खळबळ उडाली असून २१ नोव्हेंबरच्या रात्री ९.३० च्या दरम्यान सम्पद गोबीनोउद्दीन खतीब (३४) रा. वसंतनगर परिसर या तरुणाची येथील सुनसान असलेल्या परिसरात मेडिकेयर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल च्या मागील बाजूला असलेल्या खुल्या मैदानात निर्घृण हत्याकांड घडवण्यात आले.पोलिस अधीक्षक पुसदमध्ये दाखल सैय्यद मोबीनाद्दीन खतीब (३४) रा. वसंत नगर, पुसद असे मृतकाचे नाव असून जुन्या आपसी वादातून हत्या झाल्याचा संशय व्यक्त केल्या जात असून माहिती मिळताच वसंत नगर पोलिस स्टेशनचे ठाणेदार प्रवीण नाचणकर तथा शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार दिनेशचंद्र शुक्ला यांनी रात्रीच घटनास्थळ गाठून मृतदेह शवविच्छेदनाकरिता उपजिल्हा ग्रामीण रुग्णालयात पाठवून आरोपींच्या शोधार्थ पथके रवाना केलीत.
या यादरम्यान वसंत नगर
पोलीस स्टेशनचे ठाणेदार प्रवीण नाचणकर यांनी घटनेतील एका आरोपीला अटक केली असून इतर आरोपींचा शोध सुरु आहे अशी माहिती दिली. आज २२नोव्हेंबर रोजी जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. दिलीप भुजबळ (पाटील) हे पुसदला दाखल झाले असून सोबतच उपविभागीय पोलीस अधिकारी तथा सहायक पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर पोहोचलेत वृत्त लिहीपर्यंत पोलीस विभागाकडून आरोपींचा शोध घेतला जात असल्याचे समजते.
