
आरोपीला अटक करून ३०२ चा गुन्हा दाखल
तालुका प्रतिनिधी नितेश ताजणे-
तालुक्यातील पाटण पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या शिबला येथे पतीनेच पत्नीच्या अंगावर डीझल टाकून जिवंत पेटून ठार मारण्याचा प्रयत्न केला असून आगीत भाजल्याने पत्नी गंभीर जखमी झाले आहे.
शिबला येथील राहुल विशाल मरस्कोल्हे वय २८ वर्ष हा लग्नापासून नेहमी पत्नी आराध्य हिला नेहमी शारीरिक व आर्थिक त्रास देऊन चाल करीत होता .१८ जानेवारीला सायंकाळी ७ वाजता राहुल याने पत्नीला त्रास देऊन शिवीगाळ केली व तिच्या अंगावर डीझल टाकून जिवंत पेटवून दिले. होते .आगीत पत्नी आराध्य राहुल मरस्कोल्हे वय २३ वर्ष ही गंभीर जखमी झाली. आराध्य हिला पेटवून दिल्याची माहिती शिबला गावात पसरताच गावकऱ्यांनी धाव घेतली व तिला यवतमाळ येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले होते परंतु उपचारादरम्यान महिलेचा २३ जानेवारीला तिचा उपचार दरम्यान मृत्यू झाला.
. घटनेची माहिती मिळताच ठाणेदार संदीप पाटील पोलीस कर्मचारी घेऊन घटनास्थळी पोहचले.व पंचनामा केला. घटनेची तक्रार मुलीची आई लाईनीबाई आत्राम वय ५० वर्ष हिने १९ जानेवारीला दिली. यावरून पोलिसांनी पती आरोपीविरुद्ध कलम ३०७ व ४९८ (अ) नुसार गुन्हे दाखल करून आरोपी राहुल मरस्कोल्हे याला अटक करून कोठडीत डांबले. व आरोपीच्या पत्नीचा मृत्यू झाल्याने कलम ३०२ चा गुन्हा दाखल करण्यात आला. सदर कार्यवाही ठाणेदार संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अमित पोयाम,संदीप सोयम प्रशांत तलांडे व हेमंत कामतवार यांनी केली.
