

प्रतिनिधी’:सुमित चाटाळे,पहापळ
नियोजित दौरा उरकून आमदार अशोक उईके व आ. संजीवरेड्डी बोदकूरवार यांनी पहापळ प्राथमिक आरोग्य केंद्राला धावती भेट दिली प्राथमिक आरोग्य केंद्रातील कामकाज याचा आढावा घेतला व तेथील समस्या जाणून घेतल्या व तेथील कार्यपद्धती व उत्तम व्यवस्थापन पाहून दोन्ही आमदारांनी वैद्यकीय अधिकारी व संपूर्ण कर्मचारी यांचे कौतुक केले. व संपूर्ण आरोग्य केंद्राची व आसपासच्या परिसराची पाहणी केली.
आमदार श्री. अशोक उईके, आमदार श्री. संजीवरेड्डी बोदकूरवार, मा. आमदार अण्णासाहेब देशमुख पारवेकर यांच्या भेटी वेळी पंचायत समिती सभापती पंकज तोडसाम व ग्रामपंचायत सरपंच सुषमा कुडमते, उपसरपंच रमेश भुरे व सदस्य तसेच तालुका दंडाधिकारी, गट विकास अधिकारी व प्राथमिक आरोग्य केंद्र पहापळ येथील वैद्यकिय अधिकारी डॉ. हर्षल पडोळे व डॉ. मनोज झाडे व आरोग्य केंद्रातील सर्व कर्मचारी उपस्थित होते.
(प्राथमिक आरोग्य केंद्राचे कार्य उत्तम चालू असून, छान प्रकारे रुग्णांची अशी व्यवस्था केली असून, उत्कृष्ट व्यवस्थापन आहे. – आमदार श्री. अशोक उईके)
