महामार्गाला पडल्या भेगा, कामाच्या गुणवत्तेबाबत प्रश्नचिन्ह?


प्रतिनिधी, प्रवीण जोशी.
ढाणकी


ढाणकी शहराजवळून फुलसावंगी रोड पासून हायवे रोड चे काम चालू असून सर्व नियम धाब्यावर बसून व राजकारण्यांच्या वरदहस्ताने या रस्त्याचे काम चालू आहे का?? असा प्रश्न सर्वसामान्य वाटसरूंना पडला आहे. शिवाय एकेकाळी हिरव्या गर्द निसर्गाने नटलेला भाग म्हणून या परिसराला संबोधले जायचे. काही वर्षांपूर्वी या रस्त्याला प्रचंड झाडी होती रस्त्याचे काम चालू होत असताना झाडाची अतोनात कत्तल झाली आणि आपसूकच पर्यावरणात प्रदूषणात वाढ होताना दिसत आहे.
अशा कामचुकार व बेजबाबदार वृत्तीमुळे पर्यावरणाचा मात्र प्रचंड रास होताना दिसत आहे .काही दिवसापूर्वीच या राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू झाले काही ठिकाणी सुरू असलेलं काम, प्रगती पथावर तर कुठे अर्धवट असताना अनेक भेगा या महामार्गाला पडत आहेत. या मार्गावरून अनेक दुचाकी वाहने जातात तसेच आजूबाजूच्या ग्रामीण भागातील लोकांना ढाणकी हे मोठी बाजारपेठ असून व्यवहारिक दृष्टीने योग्य आहे. त्यानुसार अनेक प्रवासी दुचाकी वर येतात त्यावेळेस या भेगांमध्ये टायर फसून अपघात सुद्धा होऊ शकतो. तसेच चालू असलेले काम अनेक ठिकाणी अर्धवट तर आहेच शिवाय धुळीमुळे शेतीचे नुकसान सुद्धा होत आहे. या महामार्गावर फळबागा असून या दोन्हीमुळे फळबागेचे सुद्धा नुकसान होत आहे. तेव्हा संबंधित कंपनीचा अभियंता कंपनीच्या वरचढ आहे का?? असा प्रश्न सुद्धा या निमित्ताने उभा ठाकतो काही दिवसांपूर्वी झालेल्या महामार्गाला भेगा पडत असल्याने झालेल्या महामार्गाच्या कामावरच प्रश्नचिन्ह उपस्थित होतो. त्यामुळे या सर्व बाबीची चौकशी होणे गरजेचे आहे. खरंच हा महामार्ग गुणवत्तेनुसार किती दिवस टिकेल हा सुद्धा गहन प्रश्न आहे तसेच खड्ड्यांमुळे अनेकांचा जीव गमावण्याची वेळ येते की काय असे सुद्धा सर्व सामान्य जनतेत ला वाटत आहे व असे असताना शासनाने हे सर्व रस्ते चांगल्या पद्धतीने कसे होतील हे बघणे अत्यंत गरजेचे आहे शासन नियमित रस्त्याच्या कामासाठी लाखो रुपये खर्च करत असते परंतु या पैशाचा योग्य विनियोग होणे महत्त्वाचे आहे. कित्येक वेळा रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे होते. व त्याचा फटका कामाच्या गुणवत्तेवर बसून निकृष्ट दर्जाचे रस्ते बनले जातात त्यामुळे एकाच राष्ट्रीय महामार्गासाठी काही वर्षात पैसे खर्च करण्याची वेळ येते परिणामी जनतेलाच आर्थिक भुर्दंड सोसावा लागतो. तसेच या कंपनीचे मोठमोठी वाहने रस्ता बनवण्यासाठी गिट्टी घेऊन जाते. ते नेत असताना वाहनांमधून अनेक वेळा आकाराने लहान असलेली गिट्टी रस्त्यावर पडते त्यामुळे कदाचित दुचाकी नेत असताना ती घसरून अपघात सुद्धा होऊ शकते. पण ते बाजूला सारून रस्ता व्यवस्थित करण्याची तसदी घेतली जात नाही. तेव्हा जे कंपनी हे काम करत आहे त्या कंपनी पेक्षा संबंधित अभियंताच वरचढ ठरतो का? असा प्रश्न सर्वसामान्य वाटसरूंना व जनतेला पडत आहे.