


उमरखेड तालुका प्रतिनिधी :विलास तुळशीराम राठोड, (ग्रामीण )उमरखेड
यआढावा बैठकीतून तालुक्यातील शिवसेना, युवासेना, महिला आघाडी उमरखेड तालुका व शहर पदाधिकारी निवडीचा कार्यक्रम पार पडला व यानंतर जिल्हा पदाधिकाऱ्यांनी तालुक्यातील नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले.
शासन स्तरावरील विविध योजना प्रत्येक नागरिकांपर्यंत कशा पोहोचवायच्या यासंदर्भात सविस्तर माहिती दिली. या प्रसंगी शिवसेना संपर्कप्रमुख हरिहर भाऊ लिंगनवार , शिवसेना जिल्हाप्रमुख श्रीधर मोहड काका, सहसंपर्क प्रमुख चितांगराव कदम सर,रविभाऊ रुडे,महिला आघाडी संपर्कप्रमुख कालिंदा ताई पवार, महिला जिल्हा प्रमुख वैशालीताई मासाळ, यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये निवडी करण्यात आल्या.
प्रत्येक जिल्हा परिषद सर्कल निहाय एक उपतालुकाप्रमुखाची नेमणूक करण्यात आली. त्याचप्रमाणे पंचायत समिती सर्कलला १ विभाग प्रमुख नेमण्यात आले.
त्याप्रसंगी ख वि सघ माजी अध्यक्ष बाबुराव कदम,बबनराव कदम,शिवसेना तालुकाप्रमुख प्रवीण पाटील मिराशे, तालुकाप्रमुख संतोष जाधव, युवासेना जिल्हाप्रमुख अविनाश कदम,शिवसेना तालुका संघटक कपिल पाटील चव्हाण,शिवसेना शहर प्रमुख अतुल मेड चंद्रसेन आढागळे व मोठ्या संख्येने पदाधिकारी उपस्थित होते
