
प्रतिनिधी:: प्रवीण जोशी
ढाणकी
ढाणकी शहराजवळ फुलसावंगी फाटा चे जवळ शिक्षक कॉलनी असून मंगळवार दिनाक२८ तारखेला ला दत्तात्रय नारायण योगेवार यांचे शेत आहे ढाणकी खंड १ मधील सर्वे क्रमांक १८०/2 असा असून या ठिकाणीं शेतकऱ्याच्या शेतातील दावणीला बांधलेली कालवड बिबट्याने ठार केल्याने परिसरात दहशतीचे वातावरण पसरले आहे सध्या गव्हाचे आणि हरभरा पीक काढणीला येऊन शेत खुली होत असल्याकारणाने शेतकरी आपली जनावरे घरी न आणता शेतातच बांधतात जेणेकरून सकाळी उठून लवकर दूध काढता येईल या हिशोबाने तसे बघता ढाणकी शहरालगत हा बहुदा गेल्या कित्येक दिवसापासून चा हल्ला असावा या आधी ढाणकी पासून जवळच असलेल्या मेट व गोविंदपुर येथे सुद्धा बिबट्याने हल्ला करून शेतकऱ्याची जनावरे ठार केली विशेष म्हणजे हा हल्ला झाला तिथेच नवीन वसाहत सुद्धा व महामार्ग लगतच हे शेत असल्याकारणाने वाहनांची माणसांची येजा असताना जंगली जनावरांना सुद्धा याची भीती उरली नाही त्यांची शहराजवळ येऊन शिकार करणे हा प्रकार येणाऱ्या असंख्य संकटाचे चाहूल आहे तसेच हा भाग सतत गजबजलेला असतो विद्युत वितरण कंपनीचे कार्यालय व दोन माध्यमिक शाळा असताना एवढ्या मोक्याच्या ठिकाणी येऊन बिबट दावणीला बांधलेल्या शेतकऱ्याच्या पाळीव प्राण्यावर अशी हल्ले सतत होत असल्यामुळे जनावरे नेमके कुठे बांधावे हा यक्षप्रश्न त्यांच्यासमोर पडला आहे तसेच जंगलात दिवसा असंख्य जनावरे समूहाने चरण्यासाठी जातात आणि गुराखी सुद्धा समूहाने राहतात त्यामुळे त्यांना शिकार करणे थोडे जिकिरीचे बनत असल्याकारणाने शेतातील जनावरे समूहाने नसतात जास्तीत जास्त४ किंवा ५ जनावरे असतात त्यामुळे शिकार करणे बहुदा सुलभ होत असल्याकारणाने अशा शिकारीच्या शोधातच बिबट्या असावा तसेच आता शेतकऱ्यांचे हरभरा पिक काढणीला येत असल्याकारणाने ढग मारणे सुद्धा चालू आहे त्यामुळे शेतकऱ्यांना रात्रीला रखवालीसाठी जाव लागते त्यामुळे अशी हल्ले होत असताना शेतकरी रोज समूहाने जाऊ शकत नाही तर त्यानं वेळ प्रसंगी एकट्या सुद्धा जावं लागते त्यामुळे हे हल्ले झाल्यामुळे शेतकरी मात्र प्रचंड दहशतीखाली वावरत आहे तसे बघता जंगलातील पाणी पिण्याचे स्रोत कोरडे झाले असावे व तहान भागवण्यासाठी बिबट्या मानवस्तीकडे धाव करत असेल आणि त्याला यातच शिकार सुद्धा सापडत असल्याकारणाने येत्या काही दिवसात अशा हल्ल्याच्या संख्येत वाढ सुद्धा होऊ शकते
