संजय देशमुख यांची प्रचारात आघाडी

सहसंपादक : रामभाऊ भोयर

यवतमाळ वाशिम लोकसभा मतदार संघात महाविकास आघाडीचे उमेदवार संजय देशमुख यांनी शेवटच्या क्षणापर्यंत प्रचारात आघाडी घेतली आहे. त्यामुळे मतदारांनी देशमुख यांचे पारडे जड झाले आहे. यवतमाळ वाशिम लोकसभा ही राजकीय पक्षासाठी लक्षणीय असल्याने सर्वांचे लक्ष सध्या वाशिम यवतमाळ लोकसभेवर लागलेले आहे त्यात भारतीय जनता पार्टी व एकनाथ शिंदे गट शिवसेना यांच्या वतीने माजी खासदार पाच पंचवार्षिक राहिलेल्या भावनाताई गवळी यांना मतदार संघाचा अनुभव असताना त्यांची उमेदवारी नाकारली आहे. त्यामुळे यवतमाळ वाशिम लोकसभेतील मतदारांमध्ये संभ्रह निर्माण झाला आहे. हिंगोली मतदार संघात वास्तव्यात असलेल्या ताईना वाशीम यवतमाळ मतदार संघाची उमेदवारी जाहीर केली.त्यामुळे मतदारात खूप मोठ्या प्रमाणात संभ्रमात पडला आहे. यवतमाळ वाशिम लोकसभा निवडणुकी मधून खरंच एका ताईला डावलून दुसऱ्या ताईला सीट दिल्याने खरंच निवडून येतील का?आणि सध्या शेतकरी वर्गात जनसामान्यात असलेला शेतीमालाला भाव आणि लावलेले जीएसटीचा प्रयत्न हा समाजावर पडत असल्याने व्यापाऱ्याला जीएसटी लावल्यास काहीही मतदारांना फरक पडत नव्हता परंतु जनसामान्यांना जीएसटीचा भार सोसावा लागत असल्याने मतदारांमध्ये भारतीय जनता पार्टी यांच्या विरुद्ध खूप मोठ्या प्रमाणात आक्रोश दिसून येत आहे त्यामुळे उद्या होणाऱ्या मतदानात मतदार हा आज रोजी वाशीम यवतमाळ मतदार संघ तील मतदार जागृत असून संजय भाऊ देशमुख यांचे गुणगान गाताना सध्या दिसून येत आहे