विश्व हिंदू परिषद, बजरंग दल राळेगाव नगर कार्यकारिणी जाहीर

सहसंपादक : रामभाऊ भोयर

नरसोबा देवस्थान राळेगाव येथे आज महत्त्वाची बैठक पार पडली, त्यात देव, देश, धर्माविषयी कार्यरत अनेक युवक सहभागी झाले होते, यवतमाळ येथील विश्व हिंदू परिषद जिल्हा सहमंत्री विनोदजी सानप, बजरंग दल जिल्हा सयोंजक योगिनजी तिवारी, मेघश्यामजी चांदे मामा, बजरंग दल राळेगाव सयोजक जगदीश निकोडे, ऍड प्रितेश वर्मा, बैठकीला उपस्थित होते, यात अनेक वर्षापासून हिंदुत्वसाठी कार्यरत युवकांना जबाबदारी देण्यात आली, विश्व हिंदू परिषद रालेगाव नगर अध्यक्ष म्हनून मंगेश उईके, नगर मंत्री शंकर क्षीरसागर, नगर सयोजक सौरभ गेडाम, विद्यार्थी प्रमुख श्याम धोटे, साप्ताहिक मिलन प्रमुख प्रथमेश कोदाने,
बलोपासणा प्रमुख सागर पावडे,
सुरक्षा प्रमुख प्रतीक जुनघरे,
गोरक्षा प्रमुख शरद नेहारे याना जवाबदारी देन्यात आली अनेक वर्षाच्या कार्याची सर्वाना पावती मिळाली करिता सर्व स्थरावरुण त्यांचे अभिनंदन होत आहे