राष्ट्रीय बजरंग दल राळेगाव विधानसभा संपर्क प्रमुख पदी कुणाल केराम यांची नियुक्ती

सहसंपादक :- रामभाऊ भोयर

राळेगाव तालुक्यातील वडकी येथे कोकाटे सभागृहात आंतरराष्ट्रीय हिंदू परिषद राष्ट्रीय बजरंग दलाची बैठक पार पडली त्यात राष्ट्रीय बजरंग दल आंतरराष्ट्रीय हिंदू परिषद महाराष्ट्र/ गोवा क्षेत्रीय महामंत्री किशोर दीकोंडवार,
राष्ट्रीय बजरंग दल पूर्व विदर्भ प्रांत प्रभारी व विभाग अध्यक्ष नंदू भाऊ गट्टूवार,आंतरराष्ट्रीय हिंदू परिषद चंद्रपूर जिल्हा महामंत्री अभिजीत स्वान,राष्ट्रीय बजरंग दल चंद्रपूर जिल्हाध्यक्ष सुयोग खटी हे उपस्थित होते.
ह्यावेळी सर्वानुमते वडकी येथील रहिवासी कुणाल केराम यांना राळेगाव विधानसभा संपर्क प्रमुख पदी जवाबदारी देण्यात आली, त्यांचे मागील काळातील देव, देश, धर्मा बद्दल केलेल्या कामाबद्दल व सामाजिक कार्याबद्दल त्यांना ही मुख्य जवाबदारी देण्यात आल्याची माहिती मिळत असून, त्यांना मुख्य जबाबदारी मिळाल्याने सर्व स्थरावरून त्यांचे कौतुक होत आहे, भविष्यात आणखी मोठे संघटन उभे करून समाजातील प्रत्येक क्षेत्रा करीता काम करायचे आहे अशी प्रतिक्रिया नवनिर्वाचित संपर्क प्रमुख पदी कुणाल केराम यांनी ह्यावेळी दिली.