
सहसंपादक : रामभाऊ भोयर
रक्षाबंधन पर्वाचे निमित्त साधुन राळेगाव पोलिस स्टेशन, नगर पंचायत तसेच देशाचे, धर्माचे, समाजाचे विविध स्तरांवर संरक्षण करणारे शुरविरांचे औक्षण करुन राखी बांधण्यात आली. तसेच कर्तव्य दक्ष पोलीस बांधव आणि नगर पंचायतचे नगरध्यक्ष मा.रविंद्रजी शेराम, उपाध्यक्ष जानरावजी गिरी, नगर सेवक बाळुभाऊ धुमाळ, तुलसी जिनिंग चे संचालक संजयजी यांनाही रक्षासुत्र बांधण्यात आले. शासकिय विश्रामगृह येथे माजी शुरविर सैनिकांना रक्षा सुत्र बांधल्या गेले. यावेळी पत्रकार बांधव मोहनजी देशमुख, प्रकाशजी मेहता, डॉ.कैलाशजी वर्मा, मनोहर बोभाटे, राजुभाऊ रोहणर, माजी सैनिक श्रीरामदास धुर्वे , व बाराहाते साहेब, जिवनजी कोवे, इंद्रजीत लभाने,जगन चव्हाण जिल्हा अध्यक्ष माजी सैनिक संघटना,माजी तहसिलदार मधुकरराव गेड़ाम, भाऊराव ठाकरे, श्रीराम मंदिराचे अध्यक्ष अनिलजी वर्मा व सचिव मामा चांदे, रा. स्वं.संघाचे राळेगाव व कळंब तालुक्याचे प्रचारक अक्षय चव्हाण, सुरज गुजरकर, गुरुदेव सेवा मंडळाचे मेश्राम गुरुजी, भगवानजी धनरे सदस्य आणि वरिष्ठांचा गणमान्यांच्या उपस्थितीत रक्षाबंधनचे कार्यक्रम संपन्न झाले.
या छोट्या खानी कार्यक्रमाचे आयोजन सामाजिक कार्यकर्त्या सौ.संतोषीताई वर्मा आणि सौ.भावनाताई खंगन, श्रीमती सुनिताताई उईके यांनी केले.
