पिंपळापूर येथे सांस्कृतिक भवनाच्या मागणीला आमदार साहेबांनी दिला होकार

सहसंपादक : रामभाऊ भोयर

राळेगाव तालुकांतर्गत येत असलेल्या मौजा पिंपळापूर येथे दिनांक 18 जुलै रोजी प्राथमिक आरोग्य उपकेंद्राच्या उदघाटन सोहळ्या निमित्ताने राळेगाव विधानसभेचे आमदार प्रा. डॉ. अशोक उईके पिपळापूर येथे आले असताना येथील आदिवासी समाज बांधवांनी सांस्कृतिक भवनाची मागणी लावून धरली.सांस्कृतिक भवनाच्या मागणीला लगेच आमदार साहेबानी होकार दिला. विशेष म्हणजे मौजा पिंपळपूर येथे आदिवासी समाजाचे सन उत्सव समारंभ साजरे करण्याकरिता शासनाने १९९२, ९३साली जवाहर रोजगार योजने अंतर्गत आदिवासी समाज मंदिर बांधून दिले होते पण तेव्हापासून आदिवासी समाज मंदिराची डागडुजी सुद्धा शासनाकडून करण्यात आलेली नाही,विशेष म्हणजे इलेक्ट्रिक मीटर सुद्धा बसविण्यात आले नाही.त्यामुळे आदिवासी समाज मंदिर मध्ये कोणतेही सन उत्सव समारंभ साजरे केले जात नाही.त्यामुळे आदिवासी समाजाचे सन उत्सव समारंभ साजरे करण्यासाठी सांस्कृतिक भवनाची नी नितांत गरज असल्यामुळे समाज बांधवांनी आ.अशोक उईके यांच्या कडे मागणी केली व त्यांनी होकार दिला.

ह्यावेळी पुंडलिक कुळसंगे, विजय कोडापे, प्रवीण कुळसंगे,हनुमान गेडाम,विशाल कुळसंगे,भानुदास मेश्राम, विठ्ठल कुळसंगे,संजय कोडा पे, अमोल येटे,बंडू चांदेकर,वसंता वासेकर,रुपेश कुळसंगे,नवनीत कुळ संगे,शंकर कूळसंगे,दिलीप मेश्राम, विद्या कोडापे,माधुरी कूळसंगे,माया कुळसंगे,निर्मला कोडापे,सोनाली प्रवीण कुळसंगे,सुनीता चांदेकर,जनाबाई कुळसंगे,चंद्रकला आत्राम, फुलाबाई कूळसंगे,कांचन चांदेकर,सुंदराबाई कुळसंगे
मोठ्या प्रमाणात समाज बांधव हजर होते.