
बिरसा ब्रिगेडचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
सहसंपादक : रामभाऊ भोयर
दिनांक १८ सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी यवतमाळ यांना बिरसा ब्रिगेड च्या वतीने बिरसा ब्रिगेडचे अध्यक्ष डॉ.अरविंद कुळमेथे यांच्या नेतृत्वात एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय पांढरकवडा येथे स्वतंत्र प्रकल्प अधिकारी नेमण्यात यावा यासाठी निवेदन देण्यात आले.
मागील दहा-बारा वर्षापासून या प्रकल्प कार्यालयाला स्वतंत्र प्रकल्प अधिकारी दिलेला नसून प्रभारी प्रकल्प अधिकारी आहे.त्या मुळे आदिवासींच्या योजनांना खिळ बसली आहे.आदिवासी विकास प्रकल्प असून आदिवासींना योजनेसाठी वारंवार चकरा माराव्या लागतात.प्रकल्प अधिकारी कार्यालयात नसल्याने कर्मचारी, अधिकारी जनतेला उडवा उडविचे उत्तरे देऊन एका कामासाठी दहा चकरा जनतेला माराव्या लागतात.आश्रम शाळांच्या शिक्षणावर, आदिवासी मुला मुलींच्या वस्तीगृहावर ही अधिकाऱ्यांचे लक्ष नाही, या प्रकल्प अधिकाऱ्यांकडे उप विभागीय अधिकारी आणि प्रकल्प अधिकारी असे दोन दोन प्रभार असल्याने ते पूर्ण वेळ आदिवासी जनतेला देऊ शकत नाही.त्याच बरोबर आदिवासी जनतेचे समाधानही करू शकत नाही. योजना व्यवस्थित राबवत नाहीत, कोणतेही विकासात्मक नवीन प्रकल्प तयार केल्या जात नाही,प्रकल्प कार्यालयात गेले असल्यास तिथे अधिकारी व कर्मचारी राहत नसल्यामुळे सर्व प्रकल्प कार्यालय ओस पडल्यासारखे आहे.
तरी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय पांढरकवडा येथे स्वतंत्र मुख्य प्रकल्प अधिकाऱ्याची नेमणूक करण्यात यावी जेणेकरून आदिवासी समाजाच्या विकासाकरिता येणाऱ्या विकास निधी हा योग्य विकास प्रकल्प राबवून आदिवासी समाजाचा विकास करता येईल.
तरी तात्काळ आदिवासी विकास प्रकल्प पांढरकवडा कार्यालयासाठी स्वतंत्र मुख्य प्रकल्प अधिकाऱ्याची नेमणूक करण्यात यावी अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल असे निवेदन देण्यात आले. यावेळेस बिरसा ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष डॉ. अरविंद कुळमेथे यांच्यासह विद्या परचाके, सुरज मरस्कोल्हे, सचिन भादिकर, मनीषा तिरणकर, जयश्री मडावी, ज्योती कुळमेथे, निशा वाघाडे, तारेश वाघमारे, अल्केश कन्नाके आदी उपस्थित होते.
