
सहसंपादक :: रामभाऊ भोयर
राळेगाव तालुक्यातील प्रखर विदर्भवादी नेते माजी मंत्री नानाभाऊ येंबडवार यांचे 13/12/2025 च्या पहाटे निधन झाले..दहा वर्षे त्यांनी दिग्रस मतदार संघाचे नेतृत्व केले, अत्यंत सौम्य व अभ्यासू नेते म्हणून ते उभ्या महाराष्ट्राला परिचित होते.त्यांनी आपल्या राजकारणाची सुरुवात फारवर्ड ब्लाक या पक्षापासून केली, जेव्हा विदर्भाची चळवळ जोमात होती तेव्हा त्यांनी आदरणीय जाम्बुवंतभाऊ धोटे यांच्या हाकेला ओ देऊन काँग्रेस पक्षात प्रवेश केला…. त्यांच्या निधनाने परिसरातील जनता हळहळ व्यक्त करत आहे..या दुःखद माजी मंत्री श्री नानाभाऊ एम्बडवार यांचे आज सकाळी नऊ वाजता निधन अंत्यविधी 14/12/2025 बारा वाजता कोंगारा येथे होणार आहे घटनेची माहिती राजेश शर्मा यांनी आमच्या प्रतिनिधीला दिली.
