
सहसंपादक : रामभाऊ भोयर
सोनामाता हायस्कूल येथील सहाय्यक शिक्षक अतुल देवरावजी दांडेकर यांच्या वाढदिवसानिमित्त शाळेमध्ये फळझाडांची रोपे लावून वृक्षारोपण करण्यात आले. याप्रसंगी सर्व शिक्षक व विद्यार्थ्यांनी दांडेकर सरांना उदंड आयुष्याच्या शुभेच्छा यावेळी शाळेचे मुख्याध्यापक धोबे सर, चीव्हाणे सर, कांबळे सर, शिवणकर सर, सावंत सर, गोवारदिपे मॅडम, गावंडे मॅडम, देवानंद सोनोने,राजेंद्र झोटिंग, प्रथमेश राऊत हे सर्व कर्मचारी हजर होते.
सोनामाता हायस्कूल येथे विद्यार्थी व शिक्षक यांच्या वाढदिवसानिमित्त विवीध उपक्रम राबवल्या जातात. शाळेला विस्तृत असे मैदान लाभले असून यावर विविध प्रकारची झाडे लावण्यात आली आहेत. या उपक्रमाचा एक भाग म्हणून शाळेतील सहाय्यक शिक्षक दांडेकर सर यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण करण्यात आले. सरांचा वाढदिवस विद्यार्थी वर्गाने मोठ्या उत्साहात साजरा केला. वृक्षारोपणानंतर विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आला. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व विद्यार्थी व शिक्षक यांचे सहकार्य लाभले.
