पोंभुर्णा शिवसेनेकडून केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा विरोधात निषेध आंदोलन,नारायण राणे यांना अटक झाल्यामुळे पोंभूर्ण्यात फटाके फोडून आनंदोत्सव

पोंभुर्णा शिवसैनिक,युवासैनिकांकडून आज छत्रपती शिवाजी महाराज चौक,पोंभुर्णा येथे शिवसेना जिल्हा प्रमूख संदीपभाऊ गिर्हे यांच्या मार्गदर्शनात नारायण राणे यांनी भाजपा जनआशिर्वाद दौ-यानिमित्त रायगड जिल्ह्यातील महाड येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री व शिवसेना पक्ष प्रमुख श्री.उध्दवजी ठाकरे साहेब यांचेवर एकेरी भाषेत तीव्र अपशब्द वापरले मा.मुख्यमंत्री यांचेसह तमाम महाराष्ट्रातील जनतेचा अपमान केल्यामुळे जाहिर निषेध करुन निदर्शने देऊन अंदोलन करण्यात आले व नारायण राणे यांना पोलिसांनी कारवाई करुन अटक केल्या बद्दल फटाके फोडून जल्लोष करण्याकरिता आशिष कावटवार, शिवसेना शहर प्रमुख गणेश वासलवार,युवासेना ता.प्रमुख अभिषेक बद्दलवार,शहर प्रमुख महेश श्रिगिरिवार, विजय वासेकर,रविंद्र ठेंगणे,शिवकुमार पाल,किशोर गुज्जनवार,दिनेश गिरसावळे,लोकाजी दामपेल्लीवार,नितीन येरोजवार,पवन गेडाम,संदीप ठाकरे,गणेश दिवसे,अक्षय व्याहडकर,संदीप सुनबडकर,तुळशीराम वाढई,आशिष कावडे,राकेश मोंगरकर,अंकुश गव्हारे,अमोल कावटवार,राजू निलमवार,रंनपती वडस्कर,व आदी मोठ्या संख्येने शिवसेना युवासेना पदाधिकारी, शिवसैनिक, युवासैनिक, कार्यकर्ते, अंदोलनात सहभागी होते.