
प्रतिनिधी::प्रवीण जोशी
यवतमाळ
यंदा मुसळधार पाऊस आणि त्यानंतर पाऊस रखडल्याने आधीच शेती संकटात आली आहे. त्यातच आता सोयाबीन पिकावर पिवळ्या मोझेक रोगाने आक्रमण केले आहे. त्यामुळे मुळावा परिसरातील अनेक गावातील शेतकऱ्यांच्या शेतातील सोयाबीन पीक या रोगामुळे उध्वस्त झाले आहे. नगदी पिकावरच घातक रोगान आक्रमक केल्याने शेतकऱ्या समोर मोठ संकट निर्माण झालं आहे. आधीच शेतकरी अवकाळी आणि अतिवृष्टी अशा दुहेरी संकटात सापडला असताना, आता या घातक रोगामुळे बळीराजा चिंतातुर झाला आहे.
हा विषाणूजन्य रोग सोयाबीन पिकाची वाढ ,फुलोरा,आणि शेंगधरणीच्या काळात आल्याने या रोगामुळे अनेक शेतकऱ्यांच मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. करून नुकसानभरपाई देण्याची मागणी शेतकरी वर्गातून केली जात आहे.
त्यामुळे मेटाकुटीला आलेल्या शेतकऱ्यांना प्रशासन दिलासा देते की नेहमी प्रमाणे वाऱ्यावर सोडते याकडे तालुक्यातील शेतकऱ्यांच्या नजरा लागल्या आहेत.
प्रतिक्रिया-:
ढाणकी येथील शेतकऱ्यांचे पिवळ्या मोझेक रोगाने खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.अनेक शेतकऱ्यांच्या दोन दोन तीन तीन एकर मधील सोयाबीन पीक जळून गेले आहे.
शेंगा करपून गेल्या आहेत.
दोन महिने तळहातावर अनेक महागड्या औषधीची फवारणी करून जोपासलेलं पीक आज उपटून फेकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.त्यामुळे शासनाचे याबाबतीत गंभीरपणे विचार करून नुकसान झालेल्या पिकाचे तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना एकरी पन्नास हजार रुपये मदत द्यावी.
बालाजी रावते
ढाणकी
