
कारंजा घाडगे/प्रतिनिधी/पियूष रेवतकर
कारंजा (घा):- तालुक्यातील २७ मार्च रोजी सायंकाळच्या सुमारास वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने झोडपून काढले. वादळी वाऱ्याने चिंचोली या ग्रामीण भागातील घरांची मोठे पडझड होऊन अनेक ग्रामस्थांच्या घरावरील पत्रे सुद्धा उडून गेली आहेत. यामुळे ग्रामीण भागातील जनतेचे मोठे नुकसान झाल्याचे बोलल्या जात आहे वादळी वाऱ्यामुळे मोठे वृक्ष उखळून पडलीत. या वादळी वाऱ्यामुळे व पावसामुळे घरांच्या भिंती पडल्या ची माहिती आहेत. मात्र कोणतीही मनुष्यहानी झाली नाही सायंकाळी पाच च्या सुमारास अचानक विजा कडाडून वादळी वाऱ्यासह मोठ्या प्रमाणात पावसात सुरुवात झाली. या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे असून उन्हाळी पिकांचे जबरदस्त मोठे नुकसान झाले असल्याचे बोलल्या जात आहे तसेच परिसरातील अनेक विद्युत तार तुटल्या आहेत. चिंचोली येथील विद्युत पुरवठा खंडित झाला आहे.या अगोदरच कारंजा तालुक्यातील वादळी पावसाने मोठ्या प्रमाणात बगायती व फळबाग शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. आता पुन्हा आज च्या पावसाने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे ग्रामीण भागातील कास्तकार व जनतेने झालेल्या आर्थिक नुकसानीच्या संदर्भात पंचनामे करून आर्थिक अनुदान देण्याची मागणी चिंचोली येथील ग्रामपंचायत सदस्य मिलिंद कडवे, विश्वभुषन पाटील, जय कडवे सह नुकसान ग्रस्तांनी केली आहे.
