
सहसंपादक: रामभाऊ भोयर
राळेगाव तालुक्यातील विकसनशील गांव कीन्ही जवादे येथे ३३के.व्ही.विद्युत
उपकेंद्र होत आहे.५ हजार क्षमतेचे ट्रान्सफॉर्मर बसणार असून परिसरातील ३८ते४०गावांची व शेतकरयांचे विद्युत पुरवठा ची समस्या कायमची निकाली काढण्यासाठी हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे.पांढरकवडा, राळेगाव, हिंगणघाट ही सबस्टेशन या सोबत जोडल्या जाणार आहे.यातुन ५ स्वतंत्र फिडर निघणार असून परिसरातील गावांना भारनियमन चा सामना फार क्वचित प्रसंगी करावा लागणार आहे.शेतीपंपासाठी याचा विशेष फायदा होईल.मा.आमदार डॉ अशोकराव उईके यांच्या नेतृत्वाखाली,कीन्ही जवादे ग्रामपंचायत चे सरपंच सुधीर जवादे पाटील, उपसरपंच रमेश तलांडे, सदस्य संतोष निकुरे, सीमाताई उईके प्रतिभाताई मोहर्ले मालाताई लोणबले सुषमाताई जवादे व सचिव राजु निवल यांनी हे सबस्टेशन व्हावे यासाठी प्रयत्न केले.या प्रसंगी कीन्ही जवादे चे सरपंच सुधीर जवादे पाटील यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले.
यावेळी महावितरण चेअभियंता मिश्रा साहेब, निलेश सोनवणे जालना, संदिप पाटील गायकवाड कंत्राटदार जालना, दिलीप भोसले,चंदु भोसले, प्रमोद चरडए, अध्यक्ष भोसले देवानंद काळे दहेगाव, पुंडलीक लोणबले कीन्ही जवादे व गावकरी उपस्थित होते.
