
परवानगी न घेता झाडाची कत्तल
कायदेशीर कारवाई होणार का?
राळेगाव येथील गेल्या आठवड्यात (दि. 28 मार्च 2025) राळेगाव नगरपंचायतीने अतिक्रमण हटवण्याची मोहीम सुरू केली होती. मात्र, या मोहिमेदरम्यान एक मोठे वादग्रस्त पाऊल उचलण्यात आले बेकायदेशीर वृक्षतोड करण्यात आली असून
मिळालेल्या माहितीनुसार, अतिक्रमण हटवताना नगरपंचायत अधिकाऱ्यांनी एका मोठ्या झाडाची कत्तल केली, आणि विशेष म्हणजे, त्यासाठी कोणतीही अधिकृत परवानगी घेण्यात आली नव्हती. महाराष्ट्र सरकारने 2024 मध्ये झाडे तोडण्याबाबतचा कायदा अधिक कठोर केला असून, परवानगीशिवाय झाड तोडल्यास ₹50,000 दंडाची तरतूद आहे. परंतु, राळेगाव नगरपंचायतच्या अधिकाऱ्यांनी हा नियम धाब्यावर बसवत ही कारवाई केल्याचे समोर आले आहे.
हा प्रकार समजताच पर्यावरण प्रेमींमध्ये नाराजीचा सूर उमटू लागला आहे. काही स्थानिक नागरिकांनी याबाबत संबंधित अधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल करण्याचा इशारा दिला आहे.
“अतिक्रमण हटवणे योग्य आहे, पण झाडांची नासधूस करून कायद्याचे उल्लंघन करणे हे चुकीचे आहे,” असे स्थानिक रहिवाशांचे म्हणणे आहे.
नगरपंचायत अधिकाऱ्यांवर कीव्हा झाड तोडणाऱ्यावर कारवाई होणार का?
पर्यावरण विभाग आणि स्थानिक प्रशासन यावर काय भूमिका घेणार?
झाडे तोडल्याबद्दल ₹50,000 दंडाची तरतूद असतानाही जबाबदार अधिकाऱ्यांना शिक्षा होईल का?
नगरपंचायत अतिक्रमण हटवण्यासाठी न्यायालयाच्या आदेशावर काम करत असली, तरी कायद्याचे उल्लंघन करून झाडे तोडणे हा गंभीर मुद्दा आहे. या प्रकरणात प्रशासन कोणती भूमिका घेते आणि जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई होते का, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल!
