
सहसंपादक : रामभाऊ भोयर
चिकना येथे जनसेवा प्रतिष्ठान व रिलायन्स फाउंडेशन अंतर्गत आर्थिक डिजिटल साक्षरता प्रशिक्षण घेण्यात आले,, हे प्रशिक्षण उपसरपंच माननीय नारायणराव इंगोले यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आले , आर्थिक डिजिटल साक्षरता प्रशिक्षणा मध्ये महिलांना वेगवेगळ्या शासकीय योजनांची माहिती, आर्थिक डिजिटल देवाण-घेवाण, महिलांसाठी बचत गटाच्या योजना इत्यादीवर घेण्यात आले , वेगवेगळ्या विम्याचे महत्त्व, आयुष्यमान भारत आरोग्य कार्ड,आभाकार्ड कार्ड, इत्यादीवर माहिती माहिती. देण्यात आले
सदर प्रशिक्षण चिकना येथे घेण्यात आले त्याचबरोबर वनोजा, सरई ,निधा शेळी, अंतरगाव , रावेरी अशा वेगवेगळ्या गावांमध्ये महिलांना प्रशिक्षणाद्वारे आर्थिक डिजिटल देवाण-घेवाण करण्यासाठी महिलांना साक्षर करणे चालू आहे
सदर प्रशिक्षण हे वेगवेगळ्या गावांमध्ये जनसेवा प्रतिष्ठान व रिलायन्स फाउंडेशन अंतर्गत क्षेत्रीय कार्यकर्ता म्हणून काम करणाऱ्या सुनंदा पुडके यांच्या मार्गदर्शनातून होत आहे….
त्याचबरोबर शेतकऱ्यांना साहित्य वाटप, नाला खोलीकरण, बांधबंधिस्ती, स्मशानभूमी सौंदर्यीकरण इत्यादी कामे सुनंदा पुडके यांच्या मार्गदर्शनातून 12 गावामध्ये उपक्रम चालू आहे..
असेच उपक्रम राळेगाव तालुक्यामध्ये 40 गावामध्ये चालू आहे
