
देविदास ग्रुप अँड कंपनी तर्फे संपूर्ण भारतातील उद्योजकांसाठी लोणावळा येथे दिनांक 14 ऑगस्ट 2025 रोजी उद्योजक ट्रेनिंगचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात निवडक उद्योजकांना भारत बिजनेस अवार्ड देऊन गौरविण्यात आले.
यामध्ये ब्लू स्टार्म टीव्ही न्यूज पुणे चे मुख्य संपादक प्रकाश बळीराम सोनवणे यांना अभिनेता शहबाज खान यांच्या हस्ते सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले.
या पुरस्काराबद्दल महाराष्ट्र ब्ल्यू स्टार्म असोसिएटचे महाराष्ट्र अध्यक्ष संजीव भांबोरे, अंकुश बळीराम सोनवणे, आप्पासाहेब चव्हाण, अरुण वाघमारे यांच्यासह महाराष्ट्रातील असंख्य चाहत्यांनी त्यांचे अभिनंदन केले.
