
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर
वडकी येथील सेंट्रल बँक ऑफ इंडिया च्या शाखेमध्ये भेट दिली असून यामध्ये पीक कर्जाबाबत आढावा बैठक घेण्यात आली या आढावा बैठकी मध्ये शाखा व्यवस्थापक हजर नव्हते असून कॅश आणायला गेल्याचे यावेळी सांगण्यात आहे यावेळी बँकेचे कृषी चे गजभिये होते असून यांनी पीक कर्जासंदर्भात आढावा दिला यामध्ये बँकेने चौऱ्यांनव टक्के कर्ज वाटप केले असल्याचे सांगितले असले तरी अनेक शेतकरी या ना त्या त्रुटी कागदाचे कारण सांगून वंचित दिसत होते काही शेतकऱ्यांचे तर सातबारा वर बोजा पत्र घेऊन बँकेने पैसे न टाकल्याचे यावेळी दिसून आले यावेळी किशोर तिवारी यांनी प्रादेशिक कार्यालयातील अधिकाऱ्यांची कानउघडनी केली असून अडून असलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये तात्काळ पैसे टाकण्यासाठी यावेळी सांगितले आधीच अस्मानी संकटानी शेतकऱ्यांनी परेशान केल असून अशा मुजोर बँक व्यवस्थापकामुळे शेतकऱ्यांची कर्ज मिळविण्यासाठी अडवणूक होत होती मात्र आत्ता कै. वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशन चे किशोर तिवारी राज्य मंत्री दर्जा यांनी भेट देऊन बँकेची पोलखोल केल्यामुळे शेकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त झाले यानंतर झुल्लर कोच्ची चा पिण्याच्या पाण्याची समस्या होती असून ती विद्युत वितरण कंपनी चे कार्यकारी अभियंता यांच्यासोबत भ्रमनध्वनी वर चर्चा करून सोडविण्यात आली यावेळी प्रशासकीय अधिकारी कर्मचारी व गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते शेतकऱ्यांचे कर्ज पैसे तात्काळ नाही टाकले तर आणखी येणार असल्याचे यावेळी सांगितले.
