सावित्री(पिंप्री) येथील शेतकरी पुत्राला रानडुक्करांने धडक दिल्याने जिव गमवावा लागला, वन्यप्राण्यांचा बंदोबस्त न केल्याने घटना

सहसंपादक-रामभाऊ भोयर

दिनांक २-३-२३ रोजी पिंप्री सावेत्री येथील शेतकरी चंद्रशेखर उर्फ चेतन अशोक भोयर वय ४२ वर्ष हा खैरी गावाकडून आपल्या पिंप्री सावेत्री गावाकडे मोटरसाइकलने जात असतांना पिंप्री गावाजवळ विद्युत रोहीत्राजवळ रानडुक्करांने जोरदार धडक दिल्याने तो गंभिर जखमी पडला असता गावकऱ्यांना माहीती मिळताच त्याला तातडीने उपचाराकरिता नागपुर येथे दाखल केले असता तीन दिवस मृत्युंशी झुंज देत होता पण शेवटी दिनांक ५-३-२३रोज रविवारला उपचार सुरु असतांना मरन पावला त्याच्या पच्छात पत्नी ,छोटीशी मुलगी,आई वडील असा आप्त परीवार असल्याने आणि आता त्यांचा आधारच गेल्यामुळे शेतकऱ्यांच्या परीवारावर दुखांचा डोंगर कोसळला आहे .आता या परिवाराला वनविभाग मदत काय देणार याकडे पिंप्री सावित्री येथील शेतकऱ्याचे लक्ष वेधले असल्याचे दिसुन येत आहे. तसेच वनविभाग शेतकऱ्यांचे जिव गेल्यावर वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करतील काय ? असे शेतकऱ्यांचे म्हणणे होतांना दिसुन येत आहे.