
सहसंपादक : रामभाऊ भोयर
नगरपंचायतीच्या विषय समित्या आणि स्थायी समिती सभापती पदाची निवडप्रक्रिया आज दि २० फेब्रुवारी २०२५ रोजी पार पडली आहे.
या निवड प्रक्रियेमध्ये पाणीपुरवठा समिती सभापती म्हणून जानराव वामनराव गिरी, स्वच्छता, वैद्यक आणि आरोग्य समिती सभापती म्हणून सौ. ज्योत्सनाताई सु. डंभारे, सार्वजनिक बांधकाम समिती सभापती म्हणून दिलीप र. दूधगिकर व महिला व बालकल्याण समिती सभापतीपदी सौ. पुष्पाताई वि. किन्नाके यांची बिनविरोध निवड झाली .
वरील निवड प्रक्रीये करिता पीठासीन अधिकारी म्हणून मा. विशाल खत्री (भा.प्र.से.) तथा उपविभागीय अधिकारी राळेगाव व सहाय्यक अधिकारी म्हणून मा. गिरीष पारेकर मुख्याधिकारी गट अ न.प. राळेगाव यांनी काम पहिले.
सदर निवडणूकप्रक्रीये वेळी रविंद्र शेषराव शेराम, अध्यक्ष न.प.राळेगाव व जानराव वा.गिरी उपाध्यक्ष आणि सर्व नगरसेवक/नगरसेविका उपस्थित होते. तसेच सर्व निवड झालेले नविन सभापती यांचे मा. विशाल खत्री (भा.प्र.से.) तथा उपविभागीय अधिकारी, राळेगाव व मा. गिरीष पारेकर मुख्याधिकारी गट अ न.प.राळेगाव यांनी पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.
