महावितरण कंपनीने केली गावकऱ्यांची फसवणूक,पंचवीस दिवसांपासून पिठगीरन्या व पाणीपुरवठा बंद

राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225)

यवतमाळ जिल्हृ्यात सर्वात जास्त पावसाने राळेगाव तालुक्यातील सर्वच गावाला झोडपून काढले यात घराचे तशेच शेतीचे सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे अशातच सावनेर येथील विद्युत रोहित्र हे पाच ते सहा दिवसांपासून बंद असून या गोष्टिची माहिती राळेगाव विद्युत वितरण कंपनीला कळविली होती गावांमध्ये विद्युत वितरण कंपनीच्या काही कर्मचारी यांनी पाहिले असता विद्युत रोहित्र हे जळाले आहे असे सांगण्यात आले नविन विद्युत रोहित्र हे तुम्हाला बसवून देण्यात येईल असे गावकरी यांना सांगितले दहा पंधरा दिवसांनी जुने विद्युत रोहित्र बसवण्यात आले मात्र पिठ गिरण्या व पाणीपुरवठा सुरू झाला नाही या गोष्टिची माहिती विद्युत वितरण कंपनीच्या कनिष्ठ उप अभियंता यांना भ्रमणध्वनीवरून विचारले असता ते विद्युत रोहित्र खराब झाले आहे सांगण्यात आले एक प्रकारची गावकरी यांची राळेगाव विद्युत वितरण कंपनीने फसवून केली आहे.पावसाळ्याच्या दिवसात गावकरी यांना शुद्ध पाणीपुरवठा होत नाही आहे गढुळ पाणी पिऊन रोगराईला आमंत्रित केल्या सारखे होत आहे शेतकरी तसेच शेतमजूर हे शेतात काम करून घरी परत आल्यानंतर त्यांना अगोदर आपल्या घरचे धान्यं दळून आनन्यासाठी बाहेर गावी जा लागत आहे विद्युत वितरण कंपनीच्या काही अधिकारी यांच्याशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधला असता नाॅट रिचेबल दाखवतात या गोष्टिची वरिष्ठांनी दखल घेऊन लवकरात लवकर सावनेर या गावचे नविन विद्युत रोहित्र बसवून देण्यात यावे अशी मागणी गावकरी करीत आहे.