
सहसंपादक : रामभाऊ भोयर
राळेगाव येथे शिवसेना पदाधिकारी संवाद बैठक दिनांक ८ ऑगस्ट २०२५ रोज शुक्रवारला संत कृपा मंगलम येथे पार पडली.
या बैठकीला प्रमुख मार्गदर्शक म्हणून ज्ञानेश्वर धाने, पाटील मा. आमदार तथा निरीक्षक यवतमाळ हरिभाऊ लिंगणवार संपर्कप्रमुख यवतमाळ,गजानन डोमाळे जिल्हाप्रमुख यवतमाळ इत्यादी आदी मान्यवरांचे संवाद बैठकीला मार्गदर्शन लाभले तसेच आगामी होऊ घातलेल्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या अनुषंगाने पदाधिकारी यांना मार्गदर्शन करण्यात आले असून संघटनात्मक बांधणी बाबत आढावा घेण्यात आला.
यावेळी संवाद आढावा बैठकीला मंचावर शिवसेना तालुकाप्रमुख मनोज भोयर नगरपंचायत उपाध्यक्ष जानराव गिरी, इमरान भाई पठाण, नगरसेविका सिमरन पठाण ,कविता कुडमते, सौ. राऊत ताई सौ. बोबडे ताई कुंदाताई मिलमिले, तालुकाप्रमुख महिला आघाडी, दीपक येवले, चांदखा भाई कुरेशी, संगीता ताई आगे ,अँड योगेश ठाकरे इत्यादी मान्यवर यावेळी उपस्थित होते .या कार्यक्रमाचे प्रास्ताविक तालुकाप्रमुख मनोज भोयर यांनी तर आभार प्रदर्शन दिवाकर जवादे तसेच समालोचन अँड श्री योगेश ठाकरे यांनी केले तर सदर कार्यक्रमाला तालुक्यातील संपूर्ण शिवसेना पदाधिकारी महिला पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते
