
सहसंपादक ::रामभाऊ भोयर
आत्मनिर्भर भारत, विकसित भारत या दिशेने आपल्याला पुढे जायचे आहे. विज्ञान, तंत्रज्ञान, गणित,अभियांत्रिकी या विषयाचे विध्यार्थीदशेत संस्कार झाले, तर पुढे सक्षम व देशाला पुढे घेऊन जाणारा नागरीक निर्माण होईल, या करीता विज्ञान प्रदर्शनी हा सुप्त गुणांना वाव देणारा उपक्रम आहे.कल्पनांना नवे पंख देणारा विषय आहे असे प्रतिपादन शिक्षणाधिकारी (माध्य.) रवींद्र काटोलकर यांनी केले. स्कुल ऑफ ब्रिलीयंट राळेगाव येथे आयोजित बाल वैज्ञानिक विज्ञान प्रदर्शन 2025 चे उदघाटक म्हणून ते बोलत होते.
राळेगाव येथे 27 व 28 नोव्हेंबर 2025 ला 53 व्या दोन दिवसीय वैज्ञानिक प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले. शिक्षण विभाग, पं.स. राळेगाव, माध्यमिक मुख्याध्यापक संघ, व स्कुल ऑफ ब्रिलियंट यांचे संयुक्त विध्यमाने या प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले आहे. पहिल्या दिवशी उदघाटनीय कार्यक्रमाला उदघाटक म्हणून शिक्षणाधिकारी रवींद्र काटोलकर, कार्यक्रमाचे अध्यक्ष गटशिक्षणाधिकारी नवनाथ लहाने, विस्तार अधिकारी निलेश दाभाडे,प्रमुख मार्गदर्शक महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती जिल्हा कार्याध्यक्ष प्रकाश आंबीलकर, शाळेचे मुख्यध्यापक अन्वर सर,के. प्र. कल्पना डवले, संजय पांडे, वैरागडे सर, भोयर सर, महेश सोनेकर आदी मान्यवर उपस्थित होते.संविधानाच्या प्रास्तविकेमध्ये सर्व विध्यार्थी, शिक्षक, मान्यवर सहभागी झाले.
या प्रदर्शनीत तालुक्यातील विविध शालेय विध्यार्थ्यांनी दर्जेदार मॉडेल सह उपस्थिती दर्शवली. या बाबत शिक्षणाधिकारी व गटशिक्षणाधिकारी यांनी गौरवोदगार काढले. कार्यक्रमाचे अध्यक्षीय मनोगत मांडताना गटशिक्षणाधिकारी नवनाथ लहाने यांनी वैज्ञानिकदृष्टीकोण विकसित करणे या हेतुकडे घेऊन जाण्यासाठी हे उपक्रम सहाय्यभूत ठरतात. शिक्षणाचा उद्देश हा सुजाण नागरिकांची निर्मिती हा जर आपण मान्य केला असेल तर सुजाण समाजनिर्मितीचा वैज्ञानिकदृष्टीकोण हा पाया या विषयावर भाष्य केले. प्रमुख मार्गदर्शन म्हणून विस्तार अधिकारी निलेश दाभाडे यांनी प्रास्तवीक पर विचार मांडताना विज्ञान म्हणजे विचार करण्याचे स्वातंत्र्य त्या करीता प्रत्येक गटाला या वेळी यात सहभागाची संधी देण्यात आली, माध्यमिक, उच्च माध्यमिक सोबतच दिव्यांग व आदिवासी गटातील विध्यार्थीयांना ही यात बक्षीस मिळणार आहे असे मनोगत व्यक्त केले.
या वेळी वैज्ञानिक दृष्ठिकोन रुजवणाऱ्या विविध कलाकृती, प्रयोग यांची पाहणी मान्यवरांनी केली. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जिल्हा कार्याध्यक्ष प्रकाश आंबीलकर यांनी, विविध मनोरंजक व वैज्ञानिक प्रयोग सादर करून रंगत आणली. कार्यक्रमाचे संचलन वसुंधरा माकोडे यांनी केले.
