राळेगाव परिवहन विभागाला फलकाचे वावडे
प्रवाशांचा उडतो गोंधळ माहिती देण्यास होते टाळाटाळ

संग्रहित फोटो

सहसंपादक-रामभाऊ भोयर

शासनाच्या वतीने ७५ वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवास तर महिलांना तिकिटात ५० टक्के सवलत दिली असताना त्याचा फायदा नागरिकांना होत असून सध्या एसटी महामंडळाच्या बसेस मध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून येत आहे.मात्र बस स्थानकावरून बाहेरगावी जाणाऱ्या बसेसला गावाचा फलकच राहत नसल्याने फलाटावर लागलेली बस नेमकी कोणत्या गावाला जाते याबाबत प्रवासात संभ्रम असतो त्यासाठी बसेसला नियमित फलक लावण्याची सक्ती करण्यात यावे अशी मागणी प्रवाशांनी केली आहे.
बसेस मधून दिवसाला हजारो प्रवासी एसटी महामंडळाच्या बसने प्रवास करतात बस गाड्यांचे वेळापत्रक असले तरी त्याचे काटेकोर पालन होत नसल्याने राळेगाव बस स्थानकावर दिसून येते कारण तासान तास प्रवासी बसची वाट पाहत असतात यातही बस स्थानकावर लागणाऱ्या अनेक गाड्यांना फलकच नसल्याने प्रवासी गाडी फलटावर लागतात गाडी भोवती झुंबड करतात बसला फलक राहात नसल्याने ती गाडी नेमकी कुठल्या गावाला जाते याचा प्रश्न पडतो त्यावेळी प्रवाशी चौकशी कक्षामध्ये विचारणा करायला गेले की तिथे समाधान उत्तर मिळत नाही तर वाहक चालकांना सुद्धा विचारले तर ते सांगायला टाळतात त्यामुळे प्रवाशांची तारांबळ उडत असून प्रवाशांची गैरसोय होत आहे या प्रकारामुळे प्रवाशांना बस स्थानकावर उभी असलेली प्रत्येक गाडी कोणत्या गावाला जाते याची चौकशी करावी लागते त्यामुळे राळेगाव विभागातील बऱ्याच गाड्या या फलकाविनाच असतात प्रवाशांच्या सुविदेकरिता असे ब्रीद मिरवणारे परिवहन महामंडळ प्रवाशांना वेटीस धरत असल्याचा प्रकार दिसून येत आहे तेव्हा वरिष्ठांना वेळीच लक्ष देवून प्रत्येक बसेसला फलक लावण्याची सक्ती करण्यात यावी अशी मागणी प्रवाशी वर्गाकडून केली जात आहे.