
सहसंपादक : रामभाऊ भोयर
ग्राम स्वराज्य महामंच विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करतात याचा मुख्य उद्देश एकच की समाजातील लोकांमध्ये सामाजिक समता , आणि न्यायाची भावना निर्माण व्हावी म्हणून ३० एप्रिल २०२५ हा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त “‘ ग्राम जयंती “‘ निमित्ताने आम्ही “‘ खुली वक्तृत्व स्पर्धा “‘ आयोजित करुन “‘ सद्भभावना व्यक्त केली कार्यक्रमाचे आयोजन मा मधुसूदन कोवे गुरुजी यांनी स्वयंप्रेरणेने केले आणि समाजातील लोकांना आणि तरुणांना एक नवीन दिशा मिळावी म्हणून “‘ वक्तृत्व स्पर्धा “‘ चे आयोजन केले होते कार्यक्रमाचे अध्यक्ष मा श्रीमती आशाताई काळे आणि उद्घाटक मा विजय निवल शेतकरी संघटना यवतमाळ हे होते तसेच सहभागी पाहुणे मा दत्तात्रय चांदोरे, कृष्णा भोंगाडे, जिल्हा अध्यक्ष विदर्भ राज्य आंदोलन समीती यवतमाळ, मा बळवंतराव मडावी साहेब, गोंडवाना एकता परीषद उपस्थित होते “‘ वक्तृत्व स्पर्धा “‘ ही मुख्यतः युवा पिढी सहभागी व्हावी म्हणून प्रयत्न होते तरी तरी या स्पर्धेत प्रथम क्रमांक – कुमारी पुर्वी गजानन देशमुख सातव्या वर्गात शिकत असलेली मुलगी हिने पटकावला आणि स्वतः चे आई वडील या स्पर्धेत उपस्थित होते वक्तृत्व स्पर्धा – क्रमांक दुसरा , तरुण युवती कुमारी जयश्री डोंगरे हिने पटकावला सामान्य कुटुंबातील व्यक्तीमत्व प्रायव्हेट सेक्टर मध्ये कामं करते परंतु अतिशय महत्वपूर्ण मुद्दे मांडून आपलं व्यक्तिमत्त्व सिध्द केले हे वैशिष्ट्य वक्तृत्व स्पर्धा मध्ये आम्हाला दिसले.तृतिय क्रमांक – मा प्रल्हाद सिडाम , अध्यक्ष,कोया पुणेम गोटुल समिती यवतमाळ यांनी पटकाविले स्पर्धेत भरपूर लोकांनी भाग घेतला “‘ राष्ट्रसंत तुकडोजी महाराज”: सर्वांच्या कना कनात आणि मना मनात आहे परंतु उपक्रमाचे नियोजन कोण करेल कोण पुढाकार घेऊन तरुणांना संधी उपलब्ध करून देईल याची समाजातील तरुण युवा , युवती वाट पाहत आहे म्हणून ग्राम स्वराज्य महामंच च्या माध्यमातून मा आयोजक म्हणून मा मधुसूदन कोवे गुरुजी अध्यक्ष ग्राम स्वराज्य महामंच आणि मा गिरीधर जी ससनकर कार्याध्यक्ष, ग्राम स्वराज्य महामंच प्रा मोहन वडतकर उपाध्यक्ष आणि डॉ रेखा निमजे संचालिका यांच्या सहकार्याने ग्राम जयंतीनिमित्त वक्तृत्व स्पर्धा यशस्वी करुन दाखवली हे वैशिष्ट्य आहे या “‘ वक्तृत्व स्पर्धा “‘ या विषयावर संपूर्ण प्रास्ताविक मा मधुसूदन कोवे गुरुजी यांनी केले आहे तर या स्पर्धेचे “‘ परीक्षक “‘ म्हणून १) मा प्रकाश जी सालपे आणि २) मा चारुदत्त नेरकर यांनी जबाबदारी पुर्ण केली या वकृत्व स्पर्धेत उत्स्फूर्त सहभाग नोंदविताना मोठा आनंद झाला की अक्षय तृतीया मोठा सण लोकाचा सहभाग कमी असेल पण अपेक्षा पेक्षा जास्त प्रतिसाद पालक आणि युवक यांनी दिला तो मोठा आनंद होता मा मुरलीधर धनरे यांनी स्वखर्चाने “‘ सन्मान चिन्ह “‘ सप्रेम भेट दिले या स्पर्धेत उपस्थित सहभागी चंद्रशेखर ताम्हणे, विश्वास कुंभेकर, शंकरराव पिपरे गोविंद चव्हाण मनिराम शाहगड ,प्रेमा पत्रीवार श्रावण पाडसेनेकुन कीशोर इंगोले भाऊराव बोथे , प्रणाली देशमुख नकुल फुटाणे,साहिश गोरडे, संकल्प मरगडे स्वप्नाली मरगडे प्रल्हाद काळे देवा मडावी वेदांत कोवे एकनाथ राऊत आणि असंख्य समाजातील पालक वर्ग सहभागी झाले होते
