
सहसंपादक : रामभाऊ भोयर
राळेगाव शहरालगत श्रीसाई वृद्धाश्रम, , बाल अनाथालय व सेवारुग्णालय बांधकामाला (दि.19 जुलै ) सुरुवात करण्यात आली. राळेगाव यवतमाळ मार्गांवर हा सेवाश्रम होत आहे. बांधकाम शुभारंभ कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील गणमान्य मान्यवरांनी उपस्थिती दर्शवली. या वेळी पूजन करून इमारतीच्या कामाला सुरुवात करण्यात आली.
राळेगाव हा आदिवासी, कष्टकरी, गोर -गरीब जनतेचा तालुका आहे. इथली सम्पूर्ण अर्थव्यवस्था शेतीवर आधारित आहे. असे असले तरी या तालुक्याला एक समृद्ध ऐतिहासिक वारसा देणगी रूपाने लाभला. सीतामातेच्या वास्थव्याने हा परिसर पावन झाला आहे. या परिसरात वृद्धाश्रम, स्त्रीआधार केंद्र, अनाथ बालकांकरिता अनाथालय निर्माण व्हावे, त्यातून गरजूना आधार मिळावा अशी संकल्पना काही सुजाण नागरिकांनी मांडली या बांधकामाला सुरुवात झाल्याने या दिशेने प्रत्यक्ष कामं सुरु झाले.
काहीतरी चांगले घडावे ही आस असणारे अनेक हात या सेवाश्रमाच्या कामाला हातभार लावण्यास पुढे येत आहे.समाजातील ज्यांना आधाराची गरज आहे, अशा प्रत्येक घटकाला मदत होईल असे एक केंद्र या ठिकाणी आकारास येत आहे. या भूमिपूजन शुभारंभ प्रसंगी रवींद्र शेराम (नगर अध्यक्ष राळेगाव),जानरावजी गिरी (उपनगराध्यक्ष राळेगाव), रमेशजी कनाके, अँड.प्रफुल सिंह चौहान विनयजी मुनोत, निहालचंद गांधी, सुभाषजी मूनोत, विलासभाऊ मुके, राजुभाऊ रोहणकर, मनीषजी काळे, राजूभाऊ काळे प्रतीकजी बोबडे, महेश भोयर भाऊरावजी ठाकरे, विलासभाऊ दुधपोळे, नामदेवराव गवारकर काकाजी, राजूभाऊ दुधपोळे विनोदजी नरड, वीरेंद्र वाऱ्हेकर,
अनिल डंभारे, इम्रान पठाण
दिलीपराव मानकर, गिरिधर ससनकर, मुर्तूझा बब्बर, गजेंद्र काळे, अजगर भाऊ सय्यद, प्रकाश खुडसंगे, प्रसाद ठाकरे, पराग मानकर, निलय घिंनमिने, आकाश कुळसंगे, अनिकेत भलमे, शुभम दुधपोळे, आकाश ताठे, आदी सह अनेक नागरिक उपस्थित होते.
