
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर
स्पेक्ट्रम क्राट फायबर च्या वतीने राळेगाव,कळंब, बाभुळगाव तालुक्यातील 46 गावांमध्ये दि.10;11,12, ऑक्टोबर ला बी. सी. आय.रजिस्टर फार्मर , शेतमजूरा करीता जीप कॅम्पीयन द्वारे जनजागृती कार्यक्रम आयोजित केला आहे या कार्यक्रमात खालील प्रमाणे विषय मांडण्यात आले एकात्मिक पीक व्यवस्थापन,रॅन्डम स्प्रे , कॅलेंडर स्प्रे,काॅकटेल स्प्रे ,मित्र व शत्रु किडीची ओळख बालकामगार मिनिमम वेज ,पी.पी.ई.किट ,बाबत मार्गदर्शन करुन पाॅपलेट वितरण करण्यात आले. सदर कार्यक्रम करीता गावातील पदाधिकारी, शेतकरी शेतमजूर यांच्या मोठ्या प्रमाणात सहभाग होता या कार्यक्रमाला पीयू व्यवस्थापक श्री.संजय आंबटकर सर यांनी मार्गदर्शन केले.फिल्ड फॅसीलेटर लक्ष्मण येडस्कार, हितेश भोयर,नागसेन सुटे, आनंद मांढरे ,वैभव मेधल , वैभव इजपाडे , संदिप जगताप, प्रियंका ओंकार, अमोल बारी, आशिष कोंबे ,सागर शुक्ला यांनी सहकार्य केले.
