
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर
हिंगोली येथील महावीर भवन मध्ये द रियल हिरो अवॉर्ड 2022 आयोजन करण्यात आले होते
विवेकानंद शिक्षण प्रसारक मंडळ पहेनी द्वारा आयोजित वन्यजीव रक्षक सोहळ्यात महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातील उल्लेखनीय काम करणाऱ्या सर्पमित्र, प्राणी मित्र, वन्यजीव रक्षक, सर्प अभ्यासक यांना या सोहळ्यास बोलविण्यात आले होते यावेळी गुरुवर्य ज्येष्ठ सर्प तज्ञ डॉ. श्री. निलीम कुमार खैरे, गुरुवर्य सर्प तज्ञ व सर्पदंश चिकित्सक डॉ. संजयजी नाकाडे कार्यक्रमाचे उद्घाटक सर्प अभ्यासक वनविभागाचे देवदत्त शेळके यांच्यासह सर्पमित्र संघटक महाराष्ट्र राज्य श्री गणेश भाऊ मेहंदळे, मानद वन्यजीव रक्षक हिंगोली श्री.श्रीधर कंदी, वन्यजीव प्रेमी डॉक्टर दिलीप मस्के, आयोजक विजयराज पाटील तसेच प्रमुख पाहुणे म्हणून हिंगोली मतदार संघाचे शिवसेनेचे आमदार माननीय श्री संतोष भाऊ बांगर यांच्या उपस्थितीने सोहळ्याची शोभा वाढविली. यामध्ये द रियल हिरो, शूर तेजस्विनी, सर्प अभ्यासक, अश्या प्रकारे सन्मान देण्यात आला या सोहळ्यामध्ये राळेगाव येथील सर्पमित्र संदीप लोहकरे यांना पर्यावरण संरक्षण व संवर्धन, सर्प संवर्धन, सर्प जनजागृती इत्यादी आठ ते नऊ वर्षाची त्यांच्या कार्याची दखल घेता त्यांना ज्येष्ठ सर्प तज्ञ श्री निलीम कुमार खैरे यांच्या हस्ते “द रियल हिरो अवॉर्ड 2022” शील्ड व गौरव पत्र देऊन गौरविण्यात आले व त्यांच्या भावी कार्यास शुभेच्छा देण्यात आल्या.
त्याचबरोबर एम एच 29 हेल्पिंग हँड्स वाइल्ड ऍडव्हेंचर अँड नेचर क्लब या संस्थेचे महाराष्ट्रातील कामाची दखल घेता संस्थेच्या आठ लोकांना हा पुरस्कार देण्यात आला संदीप लोहकरे हे एम एच 29 हेल्पिंग हँड्स या संस्थेचे राळेगाव तालुक्यात तालुकाध्यक्ष म्हणून काम बघतात संदीप लोहकरे या पुरस्काराचे श्रेय संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री. निलेश मेश्राम यांना देतात तसेच राळेगाव तालुक्यात त्यांच्या टीमला व नवीन सर्पमित्राला पुढील कार्यास शुभेच्छा देतात.
