
प्रतिनिधी::प्रवीण जोशी
यवतमाळ
ढाणकी येथे मिरवणुकीला एकूण १४ दुर्गा मंडळ होते. दुर्गा मातेला निरोप देण्यासाठी दुर्गा भक्ताच्या, एकीकडे डोळ्यात अश्रू तर,दुसरीकडे जलोष, दुर्गा मातेच्या मंडपात दहा दिवस उठणे ,बसणे विविध विषयांवर चर्चा विनिमिय, डेकोरेशन,सजावट, पुज्या, आरती विविध कार्यक्रम, उत्सवाचे दिवस कुणीकडे गेले कळलेच नाही.आणि श्रावण महिन्यात अनेक सण पार पडल्यानंतर लगेचच काही आठवड्यात दुर्गाउत्सव येतो. आणि कधी दहा दिवस निघून गेले माहित सुद्धा झाले नाही अर्थातच दुर्गा निरोप देण्याची वेळ होती. आज त्या मंडपातली दुर्गा मातेची शेवटची आरती झाली अन् डोळे पाणावले आरती संपली ,दुर्गा माता की जय जगतजननी अंबाबाई की जय अशा जयघोषाने आसमंत दुमदुमून गेले होते. व या कंठ दाटलेल्या आवाजात दुर्गा भक्ताचा आवाज निघत होता.पूजा आरती झाल्यानंतर वाजत गाजत ,ढोल ताश्याच्या आवाजात सर्व दुर्गा मंडळ आठवडी बाजार येथे जमले ,तिथून शहरातील मुख्य मिरवणुक मार्गाने मिरवणुक सुरू झाली.दुर्गा मातेच्या भक्तात उत्साह पहावयास मिळाला. निसर्गराजा ने सुद्धा यावेळी उघडीक दिली होती त्यामुळे भक्त धूमधडाक्यात आपआपल्या मंडळा पुढे ढोल ताशे यांच्या तालात आनंदाने नाचत होते. मिरवणुकीत कोणत्याही समाजाच्या भावना दुखावल्या जाऊ नये यासाठी खबरदारी मनून चोख पोलिस बंदोबस्त तैनात होता,तसेच सर्व दुर्गा मंडळांनी याची खबरदारी घेतलेली दिसून आली. माता भगिनींनी मुख्य मार्गावरून दुर्गा मातेची मिरवणूक जात असताना स्वागतासाठी अतिशय सुंदर रांगोळ्या काढून गणराया प्रती आपली भक्तीयुक्त श्रद्धा प्रगट केली तसेच दुर्गा भक्तांना अनेक दात्यांनी अल्पउपहार व थंड पाण्याची व्यवस्था सुद्धा करण्यात आली होती. शहरातील नेतेमंडळी ,समाजसेवक,शांतता कमिटी सदस्य,पत्रकार संघ,वरिष्ठ मंडळी ,पोलिस प्रशासन, विद्युत वितरण कंपनीचे तसेच नगरपंचायतच्या कर्मचाऱ्यांनी सुद्धा यांनी मोलांची कामगिरी बजावत अतिशय शांततेत मिरवणुक पार पडावी यासाठी मोलाचे सहकार्य केले. यावेळी उमरखेड येथील पोलिस उपविभागीय अधिकारी यांच्या मार्गदर्शनात बीटरगाव(बु) पोलिस स्टेशनचे कर्तव्यदक्ष ठाणेदार पांडुरंग शिंदे, उपनिरीक्षक सागर अन्नमवार, रवी गीते, रोशन सरनाईक, मोहन चाटे, शरदचंद्र चव्हाण, प्रवीण जाधव,राहुल कोकरे, हिंमत जाधव व संपूर्ण पोलिस प्रशासनाने मोलाची कामगिरी बजावली त्यामुळे संपूर्ण दुर्गा मंडळ व शहरातील जनतेकडून अधिक उत्साहाचे वातावरण पहावयास मिळाले.अशा प्रकारे अतिशय शांततेत मिरवणुक पार पडली.दुर्गा मातेचे विसर्जन गांजेगाव येथील पैनगंगा नदीत करण्यात आले.
दुर्गोत्सव मंडळाने यावेळी बकासुर व तात्या विंचू नावाचे नकलाकार आणले होते यावेळी बकासुर व तात्या विंचूनी लहान मुलांचं युवकांचे सुद्धा मनोरंजन करून मने जिंकली. वेगवेगळ्या हरकती करून त्यांनी मोठ्या प्रमाणात मनोरंजन केले. अर्थातच हा बकासुर आणि तात्या विंचू म्हणजे नकलाकार होते चिमुकल्यासह पाल्यांनी सुद्धा यावेळेस बकासुर व तात्या विंचू सोबत सेल्फी काढण्याचा मोह आवरला नाही.
डीजेचा सर्वांनाच त्रास होत असताना प्रशासनाने त्यावर बंदी घालून परंपरागत वाजंत्री लावण्याचा निर्णय घेतला तसंच मुख्य मिरवणुकीच्या रस्त्यामध्ये मोठ्या प्रमाणात अतिक्रमण आहे वळणावर मोठे दगड रोवल्या गेल्यामुळे गाडी वळणावर वळवत असताना मोठ्या प्रमाणात त्रास होतो तर कुठे स्लॅबचे छप्पर समोर आलेले असताना मुख्य मिरवणूक मार्गावरील जो अतिक्रमणाचा अजगर निद्रिस्त आहे त्याचा बीमोड करण्याचे धाडस प्रशासन करेल का? हे सुद्धा बघणे तेवढेच महत्त्वाचे आहे.