खरेदी विक्री संघाची आमसभा शांततेत संपन्न



सहसंपादक : रामभाऊ भोयर

राळेगाव येथे खरेदी विक्री संघाची आमसभा दिनांक १४/९/२०२४ रोजी भाऊसाहेब कोल्हे सभागृहात दुपारी दोन वाजता शांततेत संपन्न झाली. या आमसभेचे अध्यक्ष संस्थेचे अध्यक्ष मिलिंद इंगोले हे होते.या आमसभेचे प्रास्ताविक संस्थेचे सचिव संजय जुमडे यांनी करून संस्थेची रूपरेषा स्पष्ट केली.तर आमसभेला आलेले मान्यवर, पदाधिकारी व आजिवन सदस्य यांचे आभार मानले. सोबतच कृषी उत्पन्न बाजार समिती व वसंत जिनिंगची सुद्धा आमसभा संपन्न झाली.