बस स्टेशन राळेगांव मधील पंखे बंद?.

राळेगांव तालुका प्रतिनिधी:- रामभाऊ भोयर (9529256225)

भर उन्हाळ्यात रखरखत्या मे महिन्यात बस स्टेशन राळेगांव मधील पंखे बंद चं असून,प्रचंड गरमी मुळे नाईलाजाने एस.टी.ने प्रवास करणारे प्रवासी त्रस्त झाले आहेत.
१५ मे रोजी बस स्टेशन राळेगांव बस ची प्रतिक्षा करत असताना सर्व पंखे बंद चं होते. याची विचारणा करण्या साठी लगतच्या कार्यालयात सबंधिता कडे गेले असता सबंधित अधिकाऱ्यांनी चपराशी आल्यानंतर पंखे सुरु करेल? असं उध्दट पणाच
उत्तर प्रवाशांना दिल्या वर बरीच बोंबाबोंब झाली आणि सरतेशेवटी सबंधित साहेबांनी स्वतः उठून पंखे सुरु केले.जणूकाही उपकार केल्यागत.
हा प्रसंग शिक्षक पत्रकार यांच्या समक्ष बस स्टेशन राळेगांव घडला आहे.
खूप दिवसांनी बंद असलेल्या एस.टी.कडे प्रवासी वळत आहे.
आणि असे अधिकारी प्रवाशां साठी पंखे बंद चं ठेवतात ही बाब निश्चित च लाजिरवाणी नाही का?..