राळेगांव येथील ओम साईराम मंदिराचा वर्धापन दिन सोहळाचे आयोजन

राळेगाव तालुका प्रतिनिधी -रामभाऊ भोयर

राळेगांव शहरातील काळे ले – आऊट येथे पाच वर्षापूर्वी साईभक्त सुरेशसिंह बाबुसिंहजी गहरवाल आणि साईभक्तांनी बांधलेल्या ओम साई मंदिराचा वर्धापन दिन सोहळा ६ व ७ फेब्रुवारी २०२३ ला आयोजीत करण्यात आला आहे . ओम साईराम फाल्गुन कृष्ण पक्ष तिथी दिन सोमवार दि . ६ फेब्रुवारी २०२३ सकाळी ५ वाजता साई बाबांचा अभिषेक व हवन आणि पुजन .. दि . ७ फेब्रुवारी २०२३ सकाळी ८ वाजता शोभायात्रा ओम साई मंदिर येथून निघून काळे ले – आऊट , गणेश नगर येथून साई बाबांची पालखी दिंडीच्या गजरात प्रभाग प्रदक्षिणा करण्यात येईल . दुपारी ३ वाजता काल्याचे भजन व महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजीत करण्यात आला असून रात्री ओमसाई कला मंच हिंगणघाट यांचा संगीतमय साई भजनाचा कार्यक्रम आयोजीत करण्यात आला असल्याचे प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविण्यात आले आहे . या कार्यक्रमाचा सर्व भाविकभक्तांनी लाभ घ्यावा असे आवाहन सुरेशसिंह बाबुसिंह गहरवाल आणि समस्त संचालक मंडळ काळे ले – आऊट , गणेश नगर यांनी केले आहे .