सण उत्सव आनंदाने साजरा करा परंतु कोणत्याही धर्माच्या भावना दुखावल्या जाणार नाहीत याची दक्षता घ्या. : हनुमंत गायकवाड उपविभागीय पोलीस अधिकारी

*ढाणकी प्रतिनिधी,प्रवीण जोशी


बिटरगाव पोलीस स्टेशन अंतर्गत ढाणकी दुरुक्षेत्र येथे होणाऱ्या दुर्गा उत्सव व धम्म चक्र परिवर्तन दिनानिमित्त शांतता कमिटी मीटिंग १/१०/२०२४ ढाणकी येथे कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी शांतता कमिटी मीटिंगचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून उपविभागीय पोलिस अधिकारी उमरखेड हनुमंत गायकवाड हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून आनंदराव चंद्रे, ढाणकी नगरपंचायतचे उपनगराध्यक्ष जहीर भाई,माजी कृषी उत्पन्न बाजार समिती उमरखेड सभापती बाळासाहेब चंद्रे पाटील, खाजाभाई कुरेशी, माजी जिल्हापरिषद सदस्य रमेश गायकवाड, एडवोकेट येरावार हे उपस्थित होते . यावेळी मान्यवरांनी शहरांमध्ये होणाऱ्या दुर्गा उत्सव व , धम्म चक्र परिवर्तन दिन उत्सव शांततेत व आनंदात पार पाडावे असे मनोगत यावेळी मान्यवरांनी व्यक्त केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष उपविभागीय पोलिस अधिकारी हनुमंत गायकवाड यांनी सण उत्सव आनंदाने साजरे करा परंतु कोणत्याही धर्माच्या भावना दुखावल्या जाणार नाहीत याचे सर्व समाज बांधवांनी भान ठेवावे. शहरामध्ये होत असलेल्या धार्मिक उत्सवांमध्ये कोणत्याही गोष्टीचा गालबोट न लागता उत्सव शांततेत पार पाडावे. कोणत्याही समाजाच्या भावना दुखावणार नाहीत याची दक्षता घेण्यात यावी असे आव्हान त्यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन नागेश महाजन पत्रकार यांनी केले, तरआभार प्रदर्शन पोलीस उपनिरीक्षक टीपूर्णे यांनी केले. *चौकट. होणारे सण उत्सव सर्व समाज बांधवांनी शांततेत पार पाडावे . सर्वांनी एकोप्याची भावना दाखवावी जे कोणी धार्मिक उत्सवामध्ये बाधा घालण्याचा प्रयत्न करीन त्यास कठोरात कठोर शासन दिले जाईल. त्यात कुणाचीही गय केली जाणार नाही. सन उत्सवांमध्ये बाधा आणणारे यांच्यावर ज्यावेळी कारवाई होते त्यामुळे त्यांचे सर्व कुटुंब व परिवार परेशान असतो.याचा सर्वांनी गांभीर्याने विचार करावा.

बिटरगाव पोलीस स्टेशन ठाणेदार संतोष मनवर