
प्रतिनिधी:सुमित चाटाळे , केळापूर
पंचायत समिती केळापूर चे सभापती पंकज तोडसाम यांच्यावरील अविश्वास ठराव सहा विरुद्ध एक मतांनी मंजूर करण्यात आला. यावेळी बराच पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
आज दिनांक 27 जुलै 2021 रोजी श्री. विवेक जॉन्सन उपविभागीय दंडाधिकारी, केळापूर यांच्या अध्यक्षतेखाली पंचायत समिती पांढरकवडा मा. जिल्हाधिकारी यवतमाळ यांचे दि. 07 जुलै 2021 आदेशानुसार अविश्वास प्रस्ताव साठी विशेष सभा चे आयोजन करण्यात आले होते.
दुपारी ठीक 2 वाजता सर्वप्रथम सभेत पंचायत समिती सभापती श्री. पंकज तोडसाम यांच्या विरोधात असलेल्या अविश्वास प्रस्ताव ठरावावरिल बाबी वाचण्यात आल्या, यावेळी 8 पैकी 7 सदस्य हजर होते, सुरुवातीला या प्रस्तावावर चर्चा करण्यात आली व पंकज तोडसाम यांच्या यांनी मुद्द्यातील सर्व आरोप फेटाळले व त्यानंतर प्रस्तावावर हात वर करून मतदान घेण्यात आले अविश्वास ठरावाच्या बाजूने सौ. इंदुताई मिसेवार, श्री. संतोष बोडेवार, सौ. अनुराधा वेट्टि, श्री. नरेंद्र नंदुरकर, सौ. शिलाताई गेडाम, श्री. राजेश पसलावार आदी सदस्यांनी ठरावाच्या बाजूने तर श्री. पंकज तोडसाम यांनी ठरावाच्या विरुद्ध बाजूने हात वर करून मतदान केलेले आहे. व 6 विरुद्ध 1 असा अविश्वास ठराव मंजूर झाला.
