
सहसंपादक : रामभाऊ भोयर
राळेगाव येथील संस्कृती संवर्धन महिला संस्था यवतमाळ द्वारा संचालित संस्कृती संवर्धन विद्यालय, राळेगाव येथे वैदर्भीय कवयित्री तथा संस्थापिका यांचा चौदावा स्मृतिदिन संस्कृती संवर्धन विद्यालय, राळेगाव येथे साजरा करण्यात आला.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. अशोक केवटे तर प्रमुख पाहुणे माजी मुख्याध्यापिका मा. सौ. मीनाक्षी येसेकर, प्रमुख उपस्थितीत मा. सर्वश्री गोपालबाबू कहूरके, दिपकभाऊ एंबडवार, नारायणराव काकडे, अरविंद वाढोणकर, कुंदन कांबळे, रवींद्र देशमुख, सुदाम बलकी, कृष्णाजी राऊळकर, मनोहर केवटे, संवर्धन एंबडवार, लोमेश धोबे, रमेश सरोदे, गफ्फार सेठ, आशिष माडेवार, नामदेव काकडे, जितेंद्र कहूरके, रुपराव येसेकर, मुकुंद मानकर, पूनम एंबडवार, अंतिम शंकरवार, मुख्याध्यापक दिनेश उघडे, ज्येष्ठ शिक्षिका सीमा देशमुख आदी मान्यवर उपस्थित होते.
स्व. विजयाताई एंबडवार यांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पनानंतर मान्यवरांचे स्वागतगीताने व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक करतांना विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. दिनेश उघडे यांनी स्व. विजयाताईच्या स्मृतीस उजाळा देऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी विद्यार्थ्यांनीही स्व. विजयाताई एंबडवार यांच्या स्वलिखित जाणीवा, बालजगत, शैला या काव्यसंग्रहातून काव्यगायन काव्यपुष्पांजली अर्पण केली.
यानंतर विद्यालयाच्या माजी मुख्याध्यापिका सौ. मीनाक्षी येसेकर यांच्यासह श्री. रुपराव येसेकर यांचा सेवानिवृत्ततीनिमित्त, व ज्येष्ठ गणित शिक्षक म्हणून श्री. देवेंद्र मून यांचा शाल -श्रीफळ देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेत शाळेतून प्रथम क्रमांक कु. आचल करलुके व द्वितीय दिपाली मांढरे यांचा तर शालेय विज्ञान प्रदर्शनीत प्राथमिक व माध्यमिक गटातून प्रत्येकी तीन क्रमांकाला स्मृतिचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.
यावेळी उपस्थित मान्यवर श्री.अरविंद वाढोणकर, सौ. मीनाक्षी येसेकर, श्री. दिपकभाऊ एंबडवार यांनी आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांचे कौतुक करून, स्व. विजयाताईच्या आठवणीना उजाळा दिला. कार्यक्रमाचे अध्यक्षीय भाषण अशोक केवटे यांनी केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राकेश नक्षिणे यांनी तर आभार . देवेंद्रजी मून यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक दिनेश उघडे, कु. सीमा देशमुख, . योगेश मिटकर, कु. सलमा कुरेशी, कु. ज्ञानेश्वरी आत्राम, भाग्यश्री काळे, विलास ठाकरे, अनंता परचाके, प्रकाश अंबादे आदिसह विद्यार्थ्यांनी मोलाचे सहकार्य केले.
