जनार्धन नगर भालर येथील पाणी अडवणूक करणाऱ्या सरपंच,यांचे कलम 39(1) अंतर्गत पद रद्द करा

मुख्यकार्यकारी अधिकारी यांच्याकडे ग्रा. प. सदस्य सुनीता देठे यांची तक्रार

प्रतिनिधी:नितेश ताजने,वणी

वणी तालुक्यातील भालर येथे वास्तव्याला राहणाऱ्या जनार्धन नगर येथील जनतेला मागील कित्येक दिवसापासून मूलभूत गरज असलेल्या पाण्यापासून ग्रामपंचायत भालर येथील सरपंच व सत्ताधारी सदस्य यांनी हेतुपरस्पर पाणी अडवणूक करून जनतेची फसवणूक केली असता जलसंधारण अंतर्गत प्रत्येक घरी नळ योजना देणे बंधनकारक असताना येथील सरपंच यांनी जनार्धन नगर येथील लोकांना पाण्या पासून वंचित ठेवले आहे हाच मुख्य मुद्दा घेऊन ग्रा. प.सदस्य सुनीता देठे यांनी चक्क मुख्यकार्यकारी अधिकारी यांना मोठ्या संख्येने महिला घेऊन निवेदन दिले व सरपंच यांच्यावर मूलभूत गरजा अडवणूक करणे ग्रा. प. अधिनियम 39 अंतर्गत सरपंच पदाचा दुरुपयोग केल्याची तक्रार मा मुख्यकार्यकारी अधिकारी यांच्या कडे केली असता लवकरच या प्रकरणी दखल घेऊ असे मुख्यकार्यकारी अधिकाऱ्याने ग्वाही दिली या यावेळी गावातील अनेक महिला उपस्थित होत्या.