वृक्षारोपण करुन केला वाढदिवस साजरा

प्रतिनिधी: कृष्णा चौतमाल ,हदगाव

निवघा बाजार :- येथून जवळच असलेल्या शिरड ता . हदगाव येथील सामाजीक कार्यकर्ते तथा दै . पुढारीचे पत्रकार महेश बोरकर यांचा वाढदिवस शिरड येथील जि.प. शाळेत वृक्षारोपण करुन साजरा केला .
अडचणीत मदतीला धावणारे , सामाजीक कार्यात हिरहिरीने भाग घेणारे व आपल्या लिखानातून न्याय देणारे पत्रकार महेश बोरकर यांचा वाढदिवस ४ आक्टोंबर मंगळवार रोजी जि.प शाळा शिरड येथे शिक्षक , विद्यार्थी , ग्रामस्थ यांच्या उपस्थीत शाळेच्या आवारात विविध प्रकार ची ५४ झाडे लाऊन साजरा केला .
वृक्षप्रेमी हरीशचंद्र चिल्लोरे यांनी मोफत देऊन रोपण करुन वृक्षा रोपण करीता न वृक्षाचे संवर्धन व जोपासना करण्यासाठी चिल्लोरे यांनी शिरड ची शाळा दत्तक घेतली असून या झाडांना उन्हाळ्यात सुध्दा पाणी घालून सर्व वृक्ष जगवणार असल्याचे सांगीतले . तर जिथे जागा मिळेल तिथे वृक्षा रोपण करणार असल्याचे त्यांनी सांगीतले .
यावेळी मुख्याध्यापथ नागनाथ गाबणे , बंडू माटाळकर , हरीशचंद्र चिल्लोरे , विभूते , यरमलवाड ‘ बेळगे , कुलकर्णी , डोके ‘ केंद्रे , धूतमल , कांबळे , वाघमारे , कुरे , किर्तनकार , अदी सह ग्रामस्थ उपस्थित होते .