वन्यजीव-मानवी संघर्ष,मानवी वसाहतीत शिरून वाघाचा हल्ला, कामगारावर हल्ला करत केले ठार

मागील काही दिवसापासून या भागात वाघाचे दर्शन अनेक नागरिकांना झाले मात्र याकडे कोणीही गांभीर्याने घेतले नाही त्याचा परिणाम म्हणून अखेर एकाला जीव गमवावा लागला. दिपू सिंग महतो वय 37 वर्ष हा खाजगी कंपनीमध्ये कार्यरत
होता. नाईट ड्युटी असल्याने तो न्यू हाऊसिंग कॉलोनी येथून जात होता.
त्यावेळी अचानक दबा धरून असलेल्या वाघाने हल्ला चढविला व त्याला फरफटत झुडपात नेत त्याच्यावर हल्ला केला.या हल्ल्यात दिपू ठार झाला असून नागरिकांना ज्यावेळी दिपू चा ओरडण्याचा आवाज आल्याने त्यांनी धाव घेत, शोधाशोध केली असता नाल्याजवळ त्याचा मृतदेह आढळून आला.
मागील काही दिवसांपासून तो वाघ वेकोली क्षेत्र व नागरी वस्तीत अनेकांना दिसला आहे, मात्र वनविभाग व वेकोली प्रशासन अनुचित घटना होण्याची वाट बघत होते.
ज्या रस्त्यावरून दिपू कामाला जात होता, त्या रस्त्यावर ग्रामपंचायत ने साधे लाईट सुद्धा लावले नाही, त्या मार्गावर गडद अंधार होता.


प्रशासनाच्या चुकीच्या नियोजनामुळे दिपू वाघाचा बळी ठरला. नागरी वस्तीमध्ये वाघाचा शिरकाव झाल्याने नागरिकांमध्ये चांगलीच दहशत निर्माण झाली आहे.
वाघाचा तात्काळ बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकांनी केली आहे.