
उमरी गावाजवळील देवेंद्र राऊत यांच्या शेतात असलेल्या गोठ्यात मोठा साप असल्याची माहिती शेतमालक यांनी एम एच 29 चे सर्पमित्र आदेश आडे यांना दिली. सर्पमित्र आदेश आडे व त्यांचे सहकारी सर्पमित्र गौरव खामनकर,अक्षय काकडे, तेजस्विनी मेश्राम, नम्रता आगरकर यांनी वेळ वाया ना जाता घटनास्थळी धाव घेऊन तेथे पाहणी केली असता तेथे मोठा साप आढळून आला, शेतातील गोठा हा कोंबडी व गुरांसाठी होता त्यात येवढा मोठा साप येणे म्हणजे जनावरांना व लोकांना धोका होणे आहे.
त्या सापाला सर्पमित्रनि इजा ना होता पकडले व झोळी बंद केले व शेतातील लोकांना सापा विषयी माहिती दिली व भयमुक्त केले.
त्या सापाची माहिती एम एच 29 चे तालुका अध्यक्ष संदीप लोहकरे यांना देण्यात आली प्राणी मित्र,सर्पमित्र संदीप लोहकरे असे सांगतात की पकडलेला साप हा भारतीय अजगर ( इंडियन रॉक पायथान) आहे त्याने शेतातील गोठ्यात असलेल्या कोंबडय़ा पैकी दोन कोंबडय़ा गिळल्या होत्या. हा साप भक्षाच्या शोधात त्या गोठ्या मध्ये आला असावा असा अंदाज लावल्या जात आहे पकडलेल्या सापाची लांबी अंदाजे नऊ ते दहा फुट व वजन बारा ते तेरा किलो असेल. त्याचा रंग राखाडी किंवा फिकट तपकिरी रंगावर गडद तपकिरी धबे असतात. शरीर स्थूल खवले मऊ डोळ्यातल्या बाहुल्या उभ्या, शेपूट आखूड असते पाल्या पाचोळ्याचा ढिगारा करून मादी त्यात 20 ते 80 अंडी घालते 90 ते 100 दिवसात पिल्ले अंड्यातून बाहेर येतात. पिल्लांची लांबी साधारणतः 30 से मी असते. त्याचे खाद्य उंदीर, घूस अश्या छोट्या प्राण्या पासून ते माकड, कोल्हा, कुत्रा असे मध्यम आकाराचे प्राणीही खाण्याची उदाहरणे आहेत. भारतात सर्वत्र जंगला पासून माळराना पर्यंत कुठेही आढळून येतो.
पकडलेल्या भारतीय अजगरला वनविभागाचे वनरक्षक आर आर लोखंडे, वनमजूर सचिन कन्नाके,मनोज लाकडे व एम एच 29 चे राळेगाव तालुक्यातील
करण नेहारे,सिद्धांत थुल,गणेश राखूंडे,आर्यन देवकर,सक्षम पवार
तेजस्विनी मेश्राम, नम्रता आगरकर यांच्या उपस्थितीत लोणी येथील निसर्गाच्या सान्निध्यात जंगल परिसरात सोडण्यात आले व राळेगाव आणि तालुक्यातील नागरिकांना सापाला ना मारता असा कुठल्याही प्रकारचा वन्यजीव आढळून आल्यास वनविभागाच्या टोल फ्री. क्रमांक 1926 किंवा राळेगाव तालुक्या साठी संस्थेच्या 95 61 905 143 या क्रमांकावर संपर्क करावा अशे आवाहन प्राणी मित्र संदीप लोहकरे यांची केले आहे.
