
वणी : तालुक्यातील साखरा ते शिदोला रस्त्याची त्वरित दुरुस्ती करावी या मागणी साठी माजी जिल्हा परिषद सदस्य विजय भाऊ पिदुरकर यांनी अनोख्या आंदोलनाचा इशारा दिला आहे. वेकोली वणी एरिया व सार्वजनिक बांधकाम विभागाला दिला असून, अश्या प्रकारचा इशारा देण्याची ही पहिलीच वेळ असल्याने सर्वत्र जोरदार या आंदोलनाची चर्चा सुरू आहे. वणी तालुक्यातील अनेक जोडरस्ते हे शेवटच्या घटका मोजताना दिसत आहेत. त्यातल्या त्यात तालुक्यातील साखरा ते शिंदोला रस्त्याची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे. गेली अनेक वर्षे हा रस्ता दुर्लक्षितच राहिला आहे. याच रस्त्यावरून दुचाकी चारचाकी वाहने व विद्यार्थ्यांना तारेवरची कसरत करावी लागते आहे. या रस्त्यावर सध्या सर्वत्र खड़ी व मोठमोठे खड्डे पडले आहेत. कोणताही शासकीय यंत्रणा लक्ष देत नसल्याने सार्वजनिक बांधकाम विभाग हा रस्ता त्वरित दुरुस्त करावा. जर या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम सार्वजनिक बांधकाम विभाग वणी यांनी त्वरित सुरू न केल्यास येनाड येनक चौफुलीवर दिनांक 31जुलै रोजी सकाळी अकरा वाजता आंदोलनाचा इशारा दिला आहे.
