दोन मालवाहू गाड्या समोरासमोर धडकल्या १६ जखमी ७ गंभीर

सहसंपादक : रामभाऊ भोयर

राळेगाव येथील महिला झाडगांव येथे एका विवाह सोहळ्याच्या स्वागत समारंभाच्या कार्यक्रमात भोजनाचे कॅटर्स सेवा देऊन टाटा एस मधून १२ महिला घरी परत असतांना व विरुद्ध दिशेने येणाऱ्या सिजेंटा कंपनीची जाहिरात करणाऱ्या मालवाहू गाडीची समोरासमोर धडक बसल्याने १६ जण जखमी झाले असून यात १२ महिलांचा समावेश असून ७ महिलाची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना उपचारासाठी यवतमाळ येथे हलविण्यात आले असून सदरची घटना रात्री २:३० मिनिटांच्या दरम्यान सावंगी जवळ कोपरी वळणावर घडली आहे.
ही घटना सावंगी येथील नागरिकांना कळताच येथील नागरिकांनी जखमींना ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी आणले आहे. प्राप्त माहितीनुसार कॅटर्स मध्ये काम करणाऱ्या स्त्रिया एका टाटा एस गाडी क्रमांक एम एच २९ ए एन ०७६८ यामध्ये बसल्या होत्या तर विरुद्ध दिशेने दुसरी मालवाहू गाडी एम एच २९ बी इ ५९२३ येत असताना वळणावर समोरासमोर धडक झाली. ही धडक एवढी जब्बर होती की ज्या मालवाहू गाडीत महिला बसल्या होत्या त्या गाडीचा समोरील एका बाजूचा भाग चकनाचूर झाला तर दुसरी मालवाहतूक गाडी ही दूरवर चक्क बाजूच्या शेतात फेकल्या गेली या झालेल्या धडकेत निर्मला शेंडे, सुधा शेंडे, संतोष देवतळे, विशाल श्रीरंगी, शुभम राठोड, पूजा पेंदोर ,कांचन मेश्राम, हे सात गंभीर जखमी असून यांना उपचारासाठी यवतमाळ येथे हलविण्यात आले तर उज्वला शेंडे, मंगला शेंडे, शकुंतला देशमातुरे,कलाबाई चौधरी, प्रीती शेंडे, सविता खडसे, शितल खडसे, उषा बावणे, अश्विनी मेश्राम, या किरकोळ जखमी असून यांना उपचारा नंतर घरी पाठवण्यात आले असून हे सर्व राळेगांव येथील होत्या हा अपघात रात्री अडीच्या दरम्यान झाल्याने मदत करणाऱ्यांची मोठी धावपळ झाली होती याबाबत पोलीस तपास सुरू असल्यामुळे चालकांची नावे मिळू शकली नाही.