
मार्कण्डेय पोदार लर्न स्कूल वणी मध्ये नवरात्रोत्सव निमित्त सांस्कृतिक नृत्य कला आवड असलेली विध्यार्थी व माता पालक यांनी उत्कृष्ट वेशभूषा साकारली आणि शालेय प्रांगणात रोषणाई मध्ये आपली सांस्कृतिक कला गुण विकास दृढ होइल याकरिता Garba Nights 2023 चे आयोजन करण्यात आले, कार्यक्रमाप्रसंगी
श्री मार्कण्डेय शिक्षण संस्था चे अध्यक्ष मान, रमेशजी व्हीं संकुरवार, संस्थासचिव मान, राहुल संकुरवार, तसेच प्रमूख पाहूणे म्हणून मान, कविताताई सुंकुरवार, मान.माधुरीताई सुंकुरवार,मान,कुणाल सुंकुरवार, मान, प्राचीताई सुंकुरवार, मान पुनमताई सुंकुरवार,मान, मोरेश्वर बुटले, तसेच मुख्याध्यापक मान, अमिन नुरानी सर आदी मान्यवर उपस्थित होते.मार्कंडेय पोदार लर्न स्कूल वणी मध्ये विद्यार्थी, माता पालक Garba Nights 2023, कार्यक्रमात विद्येची देवी माता सरस्वती, माता दुर्गा यांच्या फोटोला हार अर्पण करून अभिवादन करण्यात आले, दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली.
विद्यार्थीनी उत्सवात नवदुर्गा रूप वेशभुषा सादर केली, मुलींनी व माता पालक यांनी विविध प्रकारचे गरबा दांडिया नृत्य सादर केले, सादरीकरण करताना प्रत्येक स्पर्धकाच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता. शैक्षणिक विकास बरोबर सांस्कृतीक कला जोपासण्याची संकल्पना संस्थेनीं आखली. कार्यक्रमाचे संचालन, गुडिया पाठक, उल्का काकडे मॅम, त्रिवेदी मॅम, मुनाफ शेख, गौरव घुले सर यांनी केले. गरबा दांडिया, विद्यार्थी स्पर्धेत सहभागी झाले होते, परीक्षक म्हणून उपस्थीत होते, परीक्षक यांनी नेमुन दिलेल्या स्पर्धक यांना मान्यवरांचे हस्ते उत्कृष्ठ वेशभुषा व इतर स्पर्धेत आलेल्या विजेत्या ला मोमेंटो देण्यात आले, प्रांगणात विविध प्रकारचे खाऊचे दुकान लावण्यात आले, विद्यार्थी आणि पालकानी आस्वाद घेतला ,यशस्वितेकरीता शिक्षक तथा शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
