माझी उमेदवारी जनतेच्या कल्याणासाठी – अशोक मेश्राम

सहसंपादक : रामभाऊ भोयर

मी मुळातच जनतेची सेवा करण्यासाठी या मतदारसंघात आलो आहे, आजी- माजी आमदाराची 30 वर्षे फक्त जनतेची दिशाभूल व शोषण करण्यात या दोन्ही आजी -माजी आमदारांनी खर्ची घातली आहे, कोणत्याही प्रकारचा विकास करण्यात हे सपशेल अपयशी ठरले आहे.फक्त शैक्षणिक संस्था उभ्या करून लाखो रुपये डोनेशन घेऊन आपली पोटली गेल्या तीस वर्षांपासून भरत आहे, जनता उपाशी आपण तुपाशी ही सदैव यांची नीती राहिली आहे.
आज शेतकरी मरणासन्न अवस्थेतून जात आहे, सोयाबीन,कपाशिला भाव नाही, दररोज एक दोन आत्महत्या माझा बळीराजा करत आहे पण या निर्ढावलेल्या जनप्रतिनिधीना त्याचे काही सोयरसुतक नाही.
कर्मचारी जुन्या पेन्शन साठी 2004 पासून संघर्ष करत आहे पण त्याचे ऐकुन घ्यायला कोणी तयार, पेन्शन ही वृध्दापकाळात त्याच्या पोटाची भाकरी आहे,आज अनेक कर्मचारी पेन्शन नसल्यामुळे हलाखीचे जीवन जगत आहे,त्यांना त्यांचे जीवन अंधकारमय वाटत आहे.. पेन्शन च्या प्रश्नावर मी कर्मचाऱ्यांन सोबत रान उठविण्यासाठी तयार आहे.
महागाई आणि तरुणांची बेरोजगारी ही मोठी समस्या आहे व याला कांग्रेस आणि भाजप दोन्ही पक्ष सारखेच जबाबदार आहे.गरीबांनी कसे जगावे, हा मोठा प्रश्न आहे.मी या सर्व प्रश्नांवर वाचा फोडण्यासाठी जनतेचा उमेदवार म्हणून तुम्हाला कौल मागत आहे.
मा.राजसाहेब यांचे कडे नवा महाराष्ट्र घडविण्याचे व्हिजन आहे.ते तरुणांच्या गळ्यातील ताईत आहेत, त्यांच्या सारख्या सक्षम नेतृत्वाची आज महाराष्ट्राला गरज आहे म्हणून मी महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षात प्रवेश करुन जनतेचा उमेदवार म्हणून मा.राज साहेब यांचे हाथ बळकट करण्याचे ठरविले आहे.